कुरुंदवाडमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:43+5:302021-09-12T04:28:43+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात शहरावर पटवर्धन सरकारचे राज्य होते. राजाच्या राजवाड्यात गणेश मंदिर असून गणेशोत्सव काळात दीड दिवसाचा गणपती बसवण्यात येतो. ...

Farewell to Bappa for a day and a half in Kurundwad | कुरुंदवाडमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

कुरुंदवाडमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

स्वातंत्र्यपूर्व काळात शहरावर पटवर्धन सरकारचे राज्य होते. राजाच्या राजवाड्यात गणेश मंदिर असून गणेशोत्सव काळात दीड दिवसाचा गणपती बसवण्यात येतो. संस्थान खालसा झाल्यानंतर पटवर्धन सरकारच्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी राजवाडा पाडून अपार्टमेंट उभे राहिले असलेतरी गणेश मंदिर बांधून त्याठिकाणी आजही गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करून दीड दिवसानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते.

सायंकाळी पटवर्धन सरकार परिवाराकडून गणेशमूर्तीची पूजा करून कृष्णा घाटावरून नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. या वेळी भालचंद्रराव पटवर्धन, राधिकादेवी, युवराज रघुराजे, राजकुमारी राजसीदेवी उपस्थित होते.

फोटो - ११०९२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - कुरुंदवाड शहरातील राज घराण्यातील दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नेण्यात आले.

Web Title: Farewell to Bappa for a day and a half in Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.