शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आदेशावर श्वानांच्या शानदार कसरती; कोल्हापुरात पोलिस कर्तव्य मेळाव्यात रंगली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:46 IST

मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला

कोल्हापूर : परिक्षेत्रातील स्पर्धकांच्या १९ व्या पोलिस कर्तव्य मेळाव्याचे बुधवारी सकाळी पोलिस मुख्यालयात अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गुन्ह्यांच्या तपासांत महत्त्वाचे योगदान असलेले श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठसे तज्ज्ञ, संगणक तज्ज्ञ अशा विविध घटकांतील स्पर्धकांनी पोलिस कर्तव्य मेळाव्यात कौशल्याचे सादरीकरण केले. पोलिसांच्या आदेशावर विविध कसरती करणाऱ्या श्वानांनी उपस्थितांची मने जिंकली.फिर्याद दाखल करून घेण्यापासून ते घटनास्थळाचा पंचनामा, पुराव्यांचा शोध, योग्य दिशेने गुन्ह्यांचा तपास करणे, तातडीने आरोपींना पकडणे, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करणे, आरोपपत्र दाखल करण्याच्या कामात पोलिस विविध घटकांचा समावेश असतो. श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठसे तज्ज्ञ, संगणक तज्ज्ञ, पोलिस फोटोग्राफी, चित्रीकरण करणा-या पथकांचे ज्ञान अद्ययावत आणि शास्त्रीय असावे यासाठी पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार बुधवारी सकाळी पोलिस मुख्यालयात मेळाव्याची सुरुवात झाली.या मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनानंतर झालेल्या श्वानपथकांच्या स्पर्धेत श्वानांनी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कसरती करून त्यांचे कौशल्य दाखविले. शालेय विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेचा आनंद घेतला. स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी होणार आहे. उद्घाटन समारंभास अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक प्रिया पाटील (गृह), सुजितकुमार क्षीरसागर, आप्पासो पवार, निरीक्षक रवींद्र कळमकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसdogकुत्रा