शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यदूत हरपला, डॉ. घन:श्याम वैद्य यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 18:01 IST

राम मगदूम गडहिंग्लज (जि. कोल्हापूर ) : घटप्रभा (ता.गोकाक, जि. बेळगाव ) येथील कर्नाटक आरोग्य धामचे ( कर्नाटक हेल्थ ...

राम मगदूमगडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : घटप्रभा (ता.गोकाक, जि.बेळगाव) येथील कर्नाटक आरोग्य धामचे (कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. घन:श्याम माधवराव वैद्य (वय ६७) यांचे सोमवारी (दि.१५) हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.स्वाती, मुलगे डॉ. राहुल व डॉ. रोहित, बहिण डॉ. अलकनंदा, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेल्या ४ वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्याविकाराने त्रस्त होते. सोमवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी घटप्रभा शहरात सजवलेल्या उघड्या जीपमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर 'केएचआय'च्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल शिरगावकर, माजी खासदार अमरसिंह पाटील, आदींसह सीमाभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.डॉ.घनश्याम  यांनी तब्बल ४० वर्षे वैद्यकीयसेवा बजावली. दरम्यान, २०१४ ते २०२३ अखेर त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी व खजिनदारपदाची धुरा सांभाळली. वैद्यकीय उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याबरोबरच परिचारिक महाविद्यालयही त्यांनी सुरू केले. त्यामुळे परिसरातील हजारो ग्रामीण युवक- युवतींना देश- विदेशात रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळाली. 

दुसऱ्या पिढीतील दुवा निखळला!१९२९ मध्ये अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊनही बेळगावच्या डॉ.आर.जी.कोकटनूर यांनी घटप्रभेच्या माळावर 'केएचआय'ची स्थापना केली.त्यानंतर डॉ.माधवराव वैद्य यांनी त्याचा विस्तार केला.त्यांचे सुपुत्र डॉ.किरण व डॉ.घन:श्याम यांनी रुग्णालयाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले.घटप्रभा नदीच्याकाठी साकारलेले हे सेवाभावी रुग्णालय आरोग्यदायी वातावरण आणि माफक दरातील उपचारांमुळे 'मिरजेच्या वानलेस हॉस्पिटल'प्रमाणे सीमाभागात प्रसिद्ध आहे.डॉ.घन:श्याम यांच्या निधनाने रुग्णालयाच्या जडणघडणीतील दुसऱ्या पिढीतील महत्त्वाचा दुवा निखळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकdoctorडॉक्टरDeathमृत्यू