शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

CoronaVirus Lockdown : एस.टी चालक -वाहकांसाठी कौटुंबिक संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 15:32 IST

दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नातेवाईकांची भेटीगाठी, कधी समारंभ यातच सुट्टीचा दिवस संपायचा मात्र लॉकडाऊनमुळे चालक - वाहकांना कधी नव्हे ते कुटुंबाच्या सोबतीने दिवस घालवत येत आहे.

ठळक मुद्देएस.टी चालक -वाहकांसाठी कौटुंबिक संमेलनकुटूंबिया सोबत एकत्र येण्याचा दुर्मीळ क्षण : लॉकडाऊनचा परिणाम

प्रदीप शिंदेकोल्हापूर : दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नातेवाईकांची भेटीगाठी, कधी समारंभ यातच सुट्टीचा दिवस संपायचा मात्र लॉकडाऊनमुळे चालक - वाहकांना कधी नव्हे ते कुटुंबाच्या सोबतीने दिवस घालवत येत आहे.सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी अर्थात एसटीच.एसटी महामंडळाचा कणा असलेल्या चालक व वाहकांना देशातील लॉकडाऊनमुळे सुट्टी मिळाली आहे. सामान्य प्रवाशांना सणवारामध्ये सुखरुपपणे गावी सोडण्यातच चालक - वाहकांचा सणवार रस्त्यावर व्हायचा, डबल डयुटीमध्ये कधीच मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष नाही. कुटुंबाला, स्वत:ला वेळ देता येत नव्हता, मात्र या लॉकडाऊनमुळे नोकरी लागल्यापासून प्रथमच कुटूंबासोबत वेळ घालवता आल्याचे अनेक जण सांगत आहेत.दररोज सकाळी सवडीने उठणे, निवांत चहा नाष्ट करणे काहीच काम नसल्यामुळे सगळेच टिव्हीवरील बातम्या, जुन्या मालिका आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद तसेच मुलांचा अभ्यास घेण्यामध्ये स्वत: ला गुंतवणून घेत आहे. बातम्या पाहून कंटाळा आल्यावर विरंगुळा म्हणून काही सर्व जण सोशल मिडियावर रमतात.

काहींनी कॉलेज, शाळेतील, नातेवाईक , मित्र परिवार यांचे ग्रुप सोशल मिडीयावर काढले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून ते संवाद साधत आहेत. लॉकडाऊन हे चालक -वाहकांसाठी कौटुंबिक संमेलनच ठरत आहे. कुटुंबातील सदस्या सोबत एकत्र येवून खेळ खेळणे, छंद जोपासणे,जेवणकरून घरातील कामे करण्यात वेळ घालवत आहेत.

सुट्टी किंवा रजा असली तरी कधी साहेबांचा फोन येईल यांचे टेन्शन असायचे. घराच्या सोबत एकत्र येवून दिवस घालवण्यासाठी फारसा वेळ मिळतच नव्हता. खूप दिवसांनी मुलांच्या सोबत गप्पा मारणे, खेळणे यात दिवस जात आहेत.- कुलदिप हिरवे,चालक 

नोकरी निमित्त कधी पहाटे लवकर उठावे लागत होते. मात्र आता निवांत उठणे होते. घराच्या सोबत टिव्हीवरील जुन्या मालिका पाहणे, टिव्ही पाहताना मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे यामध्ये दिवस जात आहे. गेली सतरा वर्षापासून मी नोकरीला आहे इतका वेळ कधीच कुटूंबाला देता आला नव्हता.हेमंत काशीद, वाहक

कामामुळे घरातील प्रत्येकाच्या जाण्या- येण्याच्या वेळा वेगळ्या असतात. रोज एकमेकांसमोर असलो तरी खूप गप्पा होत नव्हता, मात्र आता आम्ही घरीच असल्याने मनसोक्त गप्पा होत आहेत. तसेच घरातील अनेक कामे झाली आहेत.वैशाली पाटील, वाहक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीkolhapurकोल्हापूर