शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठावरील भूतबाधा प्रकरणी कुटुंबाची चौकशी, ..त्यामुळे गुन्हा दाखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:49 IST

शिक्षित कुटुंबातही अंधश्रद्धा, गैरप्रकार रोखण्यासाठी गस्त वाढवली

कोल्हापूर : पंचगंगा नदी काठावर महिलेला झालेली भूतबाधा काढण्याचा प्रकार करणाऱ्या कुुटुंबाची लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशी केली. परडी करण्यासाठी घाटावर गेल्यानंतर अचानक महिलेच्या अंगात आल्याने तो प्रकार घडला. यात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही प्रकार नव्हता, असे लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडू नयेत यासाठी गस्त वाढवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी सर्वच पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.पंचगंगा नदी घाटावरील भूतबाधा काढण्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्ह्याच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जात होती. लक्ष्मीपुरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन व्हायरल व्हिडीओची तपासणी केली. व्हिडीओत दिसणाऱ्या शुक्रवार पेठेतील जोशी गल्ली येथे राहणाऱ्या कुटुंबाला चौकशीला बोलावले. संबंधित कुटुंबातील विवाहित मुलीचा परडी विधी असल्याने त्या पुण्यातून माहेरी आल्या होत्या. पूजा-विधी दरम्यान अचानक त्यांच्या अंगात आल्याने हा प्रकार घडला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यात अंधश्रद्धा पसरवण्याचा, फसवणूक करण्याचा किंवा अघोरी पूजेचा काही संबंध नसल्याने गुन्हा दाखल केला नाही, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.शिक्षित कुटुंबातही अंधश्रद्धा'शिक्षणाने अंधश्रद्धा कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र अनेक शिक्षित लोक अंधश्रद्धा बाळगतात आणि त्याला खतपाणीही घालतात. कुंडली पाहण्यापासून ते पशू-पक्षी बळी देण्यापर्यंत अनेक प्रकारातून भीती घातली जाते. त्यामुळे शिक्षित लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे', असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात कोरी यांनी व्यक्त केले.