खोट्या इतिहासाने माथी भडकविण्याचे काम

By Admin | Updated: April 9, 2015 00:05 IST2015-04-08T22:42:18+5:302015-04-09T00:05:16+5:30

जितेंद्र आव्हाड : दाभोळकर, पानसरेंच्या हत्येतून बोध घेण्याची गरज

False History | खोट्या इतिहासाने माथी भडकविण्याचे काम

खोट्या इतिहासाने माथी भडकविण्याचे काम

कसबा तारळे : शाहू महाराजाच्या पुरोगामी कोल्हापुरात कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या दुर्दैवी आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंदराव पानसरे हत्येपासून बोध घेणे गरजेचे आहे. आज इतिहास बिघडविण्याचे कार्य सुरू असून, खोटा इतिहास जनतेसमोर आणला जात आहे. तो इतिहास माथी भडकाविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.कंथेवाडी (ता. राधानगरी) येथे जनता दलाचे दिवंगत माजी आमदार शंकरराव धोंडी पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.
विद्यालयाच्या प्रांगणातील शंकरराव धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीपतराव शिंदे,
जिल्हा परिषदेचे सदस्य ए. वाय. पाटील यांनी अभिवादन केले.
जनता दलाचे राज्य सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी स्वागत केले. ‘भोगावती’चे संचालक वसंतराव पाटील यांनी (कै.) शंकरराव धोंडी पाटील यांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात घेताना, त्यांनी समाजातील दीन-दलित, उपेक्षित धरणग्रस्त यांच्यासाठी आमदारकी कशी पणाला लावली, त्यांचे संघर्षमय जीवन फक्त बहुजन समाजासाठी होते, असे सांगितले.
तालुका संघाचे विठ्ठलराव खोराटे, ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले, माजी सभापती संजयसिंह कलिकते, वंदना पाटील, शरद पाडळकर, श्रीकांत साळोखे, सरपंच रामचंद्र पाटील, जनता दलाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव मुसळे, संभाजीराव पाटील, माजी उपसभापती अजित पोवार, मानसिंग पाटील, सुरेश शिपूरकर, आदी उपस्थित होते.
टी. एल किल्लेदार यांनी सूत्रसंचालन, तर बी. जी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: False History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.