शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

हाँकाँगमधून कागद मागवून छापल्या बनावट नोटा, कोल्हापुरातील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:29 IST

केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई 

कोल्हापूर : हाँकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापणारा आणि ते चलनात आणणारा अशा दोघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. सिद्धेश श्रीकांत घाटगे (रा. दत्तोबा शिंदेनगर कळंबा, ता. करवीर) आणि विकास वसंत पानारी (रा. शिवसृष्टी पार्क शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.गुरुवारी रात्री ही कारवाई झाली. यांच्याकडून १२०० रुपयांची बनावट नोटा, बनावट नोटा छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. संशयित आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत.पोलिसांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला घाटगे हे घरी बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोपनीयपणे सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी घाटगे याने सरकारचा महसूल बुडवण्यासाठी बाहेरील देशातून साधनसामग्री मागवून बनावट नोटा छापत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडील ए फोर साइझचे चार पेपर, पन्नास रुपयांच्या सहा बनावट नोटा, २०० रुपयांच्या चार बनावट नोटा, ५०० रुपयांच्या चार बनावट नोटा, कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असे छापलेेले कागद जप्त करण्यात आले.घाटगे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून याची नोंद पोलिसात झाली आहे.

काही तरुण कळंब्यात बनावट नोटा छापण्याचे काम करतात आणि त्याची माहिती थेट केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत पोहोचते आणि स्थानिक पोलिसांना त्याचा काहीच सुगावा लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस