शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विज्ञान युगातही श्रद्धा कायम : एम. डी. देवर्डेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 8:59 PM

वडणगे : आदिशक्ती हा शब्द पुराणामध्ये वारंवार ऐकायला मिळतो. विज्ञानाची परिभाषा आणि अध्यात्माची परिभाषा वेगवेगळी असली तरी त्याचा अर्थ एकच असतो. विज्ञानदेखील अशी गोष्ट आहे त्यामध्ये सिद्धता आहे. परखड अर्थाने ती मांडली जाते. अध्यात्मात कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली नाही. तरीही त्याठिकाणी श्रद्धा असल्याने अध्यात्मवादी विज्ञानाला शक्यतो मानत नाहीत, असे विचार ...

ठळक मुद्देवडणगे येथे दसरा व्याख्यानमालेस प्रारंभआदिशक्ती ही ईश्वरशक्तीची जाणीव आहे, तीच या ईश्वराची महानशक्ती असते.

वडणगे : आदिशक्ती हा शब्द पुराणामध्ये वारंवार ऐकायला मिळतो. विज्ञानाची परिभाषा आणि अध्यात्माची परिभाषा वेगवेगळी असली तरी त्याचा अर्थ एकच असतो. विज्ञानदेखील अशी गोष्ट आहे त्यामध्ये सिद्धता आहे. परखड अर्थाने ती मांडली जाते. अध्यात्मात कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली नाही. तरीही त्याठिकाणी श्रद्धा असल्याने अध्यात्मवादी विज्ञानाला शक्यतो मानत नाहीत, असे विचार प्रा. एम. डी. देवर्डेकर यांनी मांडले.वडणगे (ता. करवीर) येथील लोकजागर मंचच्यावतीने आयोजित नवव्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘आदिशक्तीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून जागर’ या विषयावर ते बोलत होते.

ते म्हणाले, आपण विज्ञाननिष्ठ आहोत, तुमच्या आमच्यात विज्ञाननिष्ठा ठासून भरलेली आहे, तरीही धार्मिक भावनेची श्रद्धा कोणाचीही कमी होत नाही, विमानाची स्वत:ची अशी परिभाषा असते. पारिभाषिक शब्दाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते.आदिशक्ती म्हणजे महान उर्जा व दिव्यशक्ती असते. ही शक्ती जगाला निर्माण करते. विश्व हे महास्फोटातून निर्माण झाल्याचे विज्ञान सांगते; तर अध्यात्मातसुद्धा स्फोटातूनच जगनिर्मिती झाल्याचे सांगते. जितकी एनर्जी, उर्जा या आपल्या आदिशक्तीला मिळतात तिचे स्वरूप अध्यात्माने जाणलेले आहे. आदिशक्ती ही ईश्वरशक्तीची जाणीव आहे, तीच या ईश्वराची महानशक्ती असते.प्रास्ताविक व स्वागत आनंदराव नावले तर आभार मनोज गुरव यांनी मानले. यावेळी मंचचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास पोवार, उपाध्यक्ष एस. डी. जौंदाळ, प्रा. आनंदराव पोवार, पंडित तेलवेकर आदींसह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.