शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आरक्षण लढ्यात योगदान देणाऱ्या घटकांचा रविवारी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:27 AM

सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित

ठळक मुद्देकृतज्ञता सत्कार समारंभांचे सकल मराठा समाजातर्फे आयोजन

कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या  आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाहू छत्रपती हे भूषविणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील व जयेश कदम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या कृतज्ञता समारंभात मराठा आरक्षण लढ्यात सर्व समाजातील ज्या बांधवांनी सहकार्य केले, त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे; तर मराठा मंत्रिगट समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, महापौर माधवी गवंडी, मराठा महासंघाचे शशिकांत पोवार, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे, वरिष्ठ विधिज्ञ सतीश माने, अ‍ॅड. अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सत्यजित पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व दैनिकांचे संपादकही उपस्थित राहाणार आहेत.

या समारंभाची सुरुवात शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्याने होणार आहे. कार्यक्रमासाठी येणाºया मराठा बांधवांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात करण्यात आली आहे. तरी या समारंभास सर्व जातिधर्मांतील बांधव, भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.यावेळी नगरसेवक अजित ऊर्फ पिंटू राऊत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, इंद्रजित सावंत, रूपेश पाटील, उत्तम कोराणे, धनंजय सावंत, बाजीराव चव्हाण, विजय मांगुरे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर