शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:21 IST

पक्ष संघटन मजबूत करीत असतानाच सामान्य, गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची सूचना

कोल्हापूर : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट व त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला परिणामाचा आढावा घेत आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामाेरे जायचे आहे. त्यादृष्टीने बांधणी करा, अशी सूचना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी दिल्या असल्याची माहिती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी दिली.ते म्हणाले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या समवेत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये तब्बल साडेतीन तास राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलण्याची संधी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट होऊन महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. परंतु या दोन्ही पक्षांतराबद्दल सामान्य माणसाच्या मनांत कमालीची चीड आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची जबाबदारी जास्त वाढली आहे. पक्ष संघटन मजबूत करीत असतानाच सामान्य, गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची सूचना राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी काळात महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर काम करण्याची सूचनाही त्यांनी दिली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केल्याने आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना ताकद मिळाली आहे. या तिघांनी चांगली मोट बांधली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते हवा निर्माण करू शकतात असा त्यांना विश्वास वाटत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी