शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ५७ कोटींचा बनावट धनादेश देण्यात वित्त विभागातील सूत्रधार, मंत्री हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:56 IST

सूत्रधाराला अटक करण्याचे आदेश

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे ५७ कोटी रुपयांचे बनावट धनादेश तयार करून ही रक्कम काढण्याच्या प्रयत्नात वित्त विभागाचा सहभाग आहे. त्यांच्याकडूनच मूळ धनादेशाची अचूक माहिती बाहेर गेल्यामुळे बनावट धनादेश तयार करणे शक्य झाले, असा गंभीर आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.जिल्हा बँक शाखेतील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे बनावट धनादेशाचे प्रकरण उघड झाले. वटलेल्या धनादेशाची १८ कोटी ४ लाखांची रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी, असे मी स्वत: त्या बँकेला फोन करून सांगितल्यामुळेच ही रक्कम वर्ग झाली, असा दावा मंत्री मुश्रीफ यांनी केला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, १८ कोटी ४ लाख रुपयांचा धनादेश जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेने विनासंमती पास केला ही बँकेची चूकच आहे; पण दुसरा १९ कोटी ९८ लाखांचा धनादेश आल्यानंतर तातडीने शाखेतील कर्मचाऱ्याने मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांना संपर्क साधला. म्हणून फसवणूक टळली. त्यानंतर तातडीने बँकेच्या शाखेने १८ कोटींचा धनादेश वटलेल्या मुंबईतील साकीनाक्यावरील आयडीएफसी फर्स्ट बँकेशी संपर्क साधला. त्यामुळे रक्कम परत जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग झाली. या संपूर्ण प्रकरणात मूळ धनादेशाची सर्व माहिती बाहेर देणारे वित्त विभागातील कोण आहेत, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.

आकुर्डेही अनभिज्ञ..दुसरा धनादेश वठण्यासाठी आल्यानंतर लेखापाल अजित पाटील यांनी जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी अतुल आकर्डे यांना २१ फेब्रुवारीला सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी संपर्क साधून सहीची खात्री केली. त्यावेळी आकुर्डे यांनी धनादेशावरील सही माझीच आहे, असे सांगितले. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी प्रमुख सूत्रधाराला अटक केली पाहिजे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षकांना सूचनाबनावट धनादेशप्रकरणी पोलिसांना काय सूचना दिल्या, अशी विचारणा पत्रकारांनी विचारताच मंत्री मुश्रीफ यांनी थेट पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मोबाइलवरून संपर्कच साधला. या प्रकरणाच्या तपास काय झाला, अशी विचारणा केली. त्यांनी आम्ही माहिती मागवली असल्याचे उत्तर दिले. धनादेश जमा केलेल्या मुंबईच्या शाखेत जमा करणाऱ्यांचे खाते नंबर, त्याचा पत्ता सहज उपलब्ध असतो. पोलिसांना पाठवून त्याला तातडीने ताब्यात घ्या, त्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही, असे मंत्री मुश्रीफ यांनी बजावले.

शाखेतील लेखाधिकाऱ्यांना नोटीसमंत्री मुश्रीफ म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार पाच लाखांवरील धनादेश मंजूर करताना ज्यांचा धनादेश आहे, त्यांची लेखी संमतिपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र, असे पत्र नसतानाही १८ कोटी ४ लाख ३० हजार रुपयांचा बनावट धनादेश मंजूर करून पैसे वर्ग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील जिल्हा बँक शाखेतील लेखाधिकारी अजित पाटील यांना नोटीस दिली आहे. पाटील यांनी खात्री न करता धनादेश मंजूर केला आहे. ही त्यांची चूकच आहे. त्यांच्यावर कारवाई होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदHasan Mushrifहसन मुश्रीफ