कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरूभरून दिले आहे. विरोधक उपहासाने आता काहीही बोलत असेल तरी यापुढील काळात विकासाची गंगा जिल्ह्यात येईल. समर्थन असणाऱ्या गावांसह कोल्हापूर शहराची हद्दवाढही होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना होणार आहे. चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुका होतील. त्याची प्रक्रिया सुरू आहे. महायुतीचे सरकार निवडणूक काळात दिलेली सर्व आश्वासने पाळत आहे. लाडक्या बहिणांना पैसे मिळाले आहेत. कर्जमाफीचे आश्वासनही सरकार पूर्ण करेल. उसाचा हंगाम सुरळीत सुरू आहे. सर्वच कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीपेक्षा अधिक पैसे देण्याचा विषय समन्वयाने सोडविला जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विषय दराचा अजेंन्डा आहे. यामुळे स्वाभिमानी ऊस दराची मागणी करीत आहे.
भाजपचाच पालकमंत्री व्हावाकोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचाच व्हावा, अशी आमची मागणी आहे, असे खासदार महाडिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.