पंजाब नॅशनल बँकेतर्फे निर्यात-आयातदार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:05+5:302021-09-12T04:29:05+5:30

कोल्हापूर : पंजाब नॅशनल बँकेच्यावतीने कोल्हापूरच्या आघाडीच्या निर्यातदार-आयातदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये २० जणांनी सहभाग घेतला. कोल्हापूरच्या उद्योगपतींनी बँकेच्या ...

Export-Importer Meeting on behalf of Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँकेतर्फे निर्यात-आयातदार बैठक

पंजाब नॅशनल बँकेतर्फे निर्यात-आयातदार बैठक

कोल्हापूर : पंजाब नॅशनल बँकेच्यावतीने कोल्हापूरच्या आघाडीच्या निर्यातदार-आयातदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये २० जणांनी सहभाग घेतला. कोल्हापूरच्या उद्योगपतींनी बँकेच्या सेवेबद्दल प्रशंसोद्गार काढले.

सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या सर्वांत मोठ्या बँकेतर्फे जेम स्टोन कोल्हापूर शाखेला फॉरेक्स ट्रेडिंग शाखा म्हणून नियुक्त केले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बँकेचे विभागीय प्रमुख देवेंद्र सिंह यांनी स्वागत केले. अध्यक्षस्थानी महाव्यवस्थापक रामदास हेगडे होते.

देवेंद्र सिंह यांनी या वेळी विदेशी मुद्रा व्यवसायाला आधार देण्यासाठी बँकेकडून होत असलेल्या नव्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. रामदास हेगडे म्हणाले, बँक आपल्या निर्यातदार-आयातदार ग्राहकांना सर्वांत कमी खर्चात सर्व शक्य आर्थिक मदत पुरवत आहे. ग्राहक मोबाईल/लॅपटॉपच्याद्वारे फॉरेक्स व्यवहार बुक करू शकतात. या वेळी उपविभागीय प्रमुख मनोज गजभिये, सुनील मिस्त्री, शिवरतन मारोठिया, बलराम जाधव, लतिका कुंभारे, देवदास शिंदे, सनद अडमुक्ते, शैलेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Export-Importer Meeting on behalf of Punjab National Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.