शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Kolhapur: अंबाबाई मूर्तीबाबत तज्ज्ञांचा अहवाल आज होणार सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 17:35 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती संदर्भात आज गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांचा मूर्तीची स्थिती ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती संदर्भात आज गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांचा मूर्तीची स्थिती व उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर होणार असून त्यानंतर होणाऱ्या पुढील सुनावणीत अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून ही झीज रोखण्यात रासायनिक संवर्धन देखील कमी पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्तीची पाहणी करून सद्य स्थितीचा अहवाल देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली जावी अशी याचिका दिवाणी न्यायालयात केली होती.यावर सुनावणी होऊन पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगिराज व आर. एस. त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १४ व १५ मार्च रोजी मूर्तीची पाहणी केली. त्यांचा अहवाल तयार झाला असून तो त्यांनी सोमवारी पोस्टाने न्यायालयाला पाठवला आहे. त्यामुळे अहवाल आज गुरुवारी न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे.अहवाल सादर झाल्यानंतर तो वादी-प्रतिवादींना दिला जाईल. त्यानंतर पुढील सुनावणीत अहवालावर चर्चा होईल. तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार मूर्तीचे जतन संवर्धन केले जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर