शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Kolhapur: कासारी नदीत सापडला विदेशी जातीचा सकर मासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 3:56 PM

यापूर्वी उजनी धरण आणि कृष्णा नदीपात्रात या माशाचे अस्तित्व आढळले होते

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : दक्षिण अमेरिकेच्या जलाशयात अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका भागविणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. यापूर्वी उजनी धरण आणि कृष्णा नदीपात्रात या माशाचे अस्तित्व आढळले होते. येथील सुनील जाधव, अनिल जाधव आणि कृष्णात सातपुते मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांना कासारी नदीत मासेमारी करताना जाळ्यात वेगळ्या प्रकारचा सकर मासा सापडला. त्यांच्याबाबत काहीच माहीत नसल्याने त्यांनी त्याला पाण्याच्या टाकीत सुरक्षित ठेवले आहे.हा मासा दक्षिण अमेरिकेतील आहे. फिश टँकमधील शोभीवंत म्हणून या माशाला पाळले जाते. कालांतराने त्याच्या आकारामुळे त्याला सांभाळणे शक्य नसल्याने लोक त्याला जवळपासच्या नैसर्गिक अधिवासातील तलाव, नदीत सोडतात. परंतु, हेच कृत्य तेथील अधिवासाला घातक ठरत आहे. कारण हा मासा त्या अधिवासामध्ये सापडणाऱ्या प्रदेशनिष्ठ माशांची अंडी व त्यांच्या लहान पिलांना भक्ष्य बनवतो आणि आपली संख्या वाढवतो. भारतातील अनेक जलाशयांमध्ये परदेशी माशांनी अस्तित्व निर्माण केले आहे. यांच्यामुळे तेथील जलसंपदा नष्ट होत आहे. कठोर कवचांनी बनलेल्या शरीरयष्टीमुळे हा मासा खात नाहीत. अशा प्रकारच्या माशांच्या जाती छंदापोटी पाळतात आणि आकारामुळे पाळणे शक्य नसल्याने नद्या, तलावांमध्ये सोडल्याने मत्स्य प्रजातींसाठी बाधक ठरत आहेत.याच प्रकारचा जेवणामध्ये वापरला जाणारा तिलाप मासा सकर माशाप्रमाणे बाहेरच्या आफ्रिकेतून माणसांच्या हौसेसाठी आणला गेला. चांगल्या चवीमुळे लोकांनी त्याला स्वीकारले. तिलाप मासा नदी, तलावामधील देशी माशांना भक्ष्य बनवून जगत असून, त्यांची प्रजात वाढताना दिसत आहे. विदेशी माशांना पसंती देणे टाळावे. त्याचबरोबर त्यांना अशा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडू नये जेणेकरून आपली जैवविविधता अबाधित राहील.

भारतीय वंशाच्या माशांना घातक ठरणाऱ्या परदेशी माशांच्या जातींची माहिती नागरिकांना दिली पाहिजे. परदेशी मासे नैसर्गिक जलाशयात सोडल्यास त्याचे परिणाम किती घातक होऊ शकतात, याविषयी प्रशासनाने जागरूक केले पाहिजे. तिलाप जातीच्या माशाची शेती संवेदनशील क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या साठ्यांमध्ये करण्यास प्रशासनाने बंदी आणावी. त्यामुळे प्रदेशनिष्ठ माशांच्या जातींचे अस्तित्व संपवणार नाही. - अभिषेक शिर्के, प्राणीशास्त्र विद्यार्थी ( मत्स्य निरीक्षक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी