शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर भूतबाधा काढण्याचा प्रकार, पूजा-विधीचा व्हिडिओ व्हायरल

By उद्धव गोडसे | Updated: June 10, 2025 16:40 IST

पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या प्रकारात वाढ

उद्धव गोडसेकोल्हापूर : महिलेला भूतबाधा झाल्याचे समजून पंचगंगा नदी घाटावर पूजा-विधी करीत भूतबाधा काढण्याचा प्रकार सोमवारी (दि. ९) मध्यरात्री सुरू होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा आणि मांत्रिकावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. दरम्यान, पुरोगामी म्हणवणा-या कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढत असल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून उमटत आहेत.एरवी रात्रीच्या जेवणानंतर पाय मोकळे करण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर फेरफटका मारणा-या पेठेतील कोल्हापूरकरांना रस्सा मंडळे, जेवणावळ्या नेहमीच्या असतात. सोमवारी रात्री मात्र नदी घाटावर वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. बाहेरगावातून आलेले १० ते १२ लोक काहीतरी पूजा-विधी करीत होते. यात दोन महिलांचाही समावेश होता. अचानक एका महिलेच्या अंगात येते. विचित्र हास्य करीत ती घुमत होती. समोर बसलेल्या मांत्रिकाने काही विधी करून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. याबाबत काही तरुणांनी विचारणा केली असता भूतबाधा, लागीर काढले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याचा पाच मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच कोल्हापूरच्या पुरोगामीत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिस काय करणार?पंचगंगा नदी घाटावर गैरप्रकार करून अंधश्रद्धा पसरवणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशा घटना घडताच पोलिसांनी स्वत:हून याची दखल घेत कारवाई करावी, अशी मार्गदर्शक सूचना कायद्यात आहेत. त्यामुळे पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष असल्याचे अंनिसच्या पदाधिका-यांनी सांगितले. 

भोंदूगिरीचे प्रकार वाढलेगुप्त धनासाठी अघोरी पूजा करणे, मुलींच्या फोटोंना टाचण्या लावून ते झाडांवर चिकटवणे, उतारे टाकणे.. असे प्रकार अलीकडे वाढले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही भोंदूगिरीचे प्रकार सुरू आहेत. काही शिक्षित लोकांचाही यात सहभाग वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.