शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पावनगड स्वच्छता मोहिमेतून दक्षिण दरवाज्याचे अस्तित्व उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:18 PM

छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडनजीकच्या मार्कंडेय पर्वतावर नवीन उभारलेला दुर्ग म्हणजे पावनगड. काळाच्या ओघात गडावरील दोनपैकी हणमंत दरवाजा नामशेष झाला असून, दुसऱ्या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही ३५० वर्षांनंतरही टिकून

ठळक मुद्देश्री शिवाजी मºहाठा फौंडेशनची मोहीम : डागडुजीची मागणी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडनजीकच्या मार्कंडेय पर्वतावर नवीन उभारलेला दुर्ग म्हणजे पावनगड. काळाच्या ओघात गडावरील दोनपैकी हणमंत दरवाजा नामशेष झाला असून, दुसऱ्या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही ३५० वर्षांनंतरही टिकून आहेत. या दरवाज्याच्या अवशेषाची स्वच्छता मोहीम श्री शिवाजी मºहाठा फौंडेशनच्यावतीने राबविली. यामुळे दक्षिण दरवाज्याचे सध्याचे अस्तित्वातील अवशेष उजेडात आले.

पावनगड हा शिवाजी महाराज यांनी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जद यांच्या कल्पकतेतून उभारला. गडाच्या दोनपैकी हणंमत दरवाजा नामशेष झाला, तर कोल्हापुरातील मोडी संशोधक अमित आडसुळे यांनी गडाबद्दलच्या दरवाज्यांची नावे, तुपाची विहीर, गडावरील मंदिरे, राजवाडा यांच्या माहितीची कागदपत्रे प्रकाशात आणली. इतिहास अभ्यासक राम यादव यांनी गडाच्या संशोधनातून पावनगडासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी उजेडात आणल्या. त्यातून हणमंत आणि दक्षिण दरवाज्यांची छायाचित्रे उपलब्ध झाली. त्यावरूनच दक्षिण दरवाज्याचे महत्त्व विषद करणारे अवशेष दृष्टीस पडले. दरवाज्याची रचना बुरुजामधून पण सहजासहजी दृष्टीस न पडणारा, नागमोडी वळणाने किल्ल्यात जाण्यासाठी प्रमुख मार्ग होता असा एकमेव दरवाजा असावा, असा अंदाज आहे.

या दरवाज्याच्या माहितीचा ऐतिहासिक ठेवा सर्वसामान्यांसाठी उजेडात यावा या हेतूने रविवारी पावनगडावरील दक्षिण दरवाज्याच्या अवशेषांची स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे दक्षिण दरवाज्याचे सध्या अस्तित्वात असणारे अवशेष उजेडात आले. उपलब्ध चित्रानुसार गडावरील एका बुरुजामधील असणारा हा दरवाजा. बुरुज ढासळला तरी त्या दरवाज्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आजही नजरेत भरते. त्याचबरोबर भग्न बुरुजाच्या अवशेषावरून त्या बुरुजाचा डोलारा भक्कमपणे नजरेत भरतो.

स्वच्छता मोहिमेत इतिहास अभ्यासक राम यादव, इतिहास व मोडी अभ्यासक अमित आडसुळे, रविराज कदम, अनिकेत जाधव, अभिजित सूर्यवंशी, रोहित पाटील, अमित कातवरे, सुजित जाधव, प्रसाद पाटील, देवेंद्र भोसले, दिगंबर भोसले, आशुतोष सूर्यवंशी, सूरज गणाचार्य, वैभव भोसले, गणेश खोडके यांनी सहभाग घेतला.पावनगड हा वनखात्याच्या अखत्यारित असून पुरातत्त्व यादीत नाही. पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार वास्तुचे जुने चित्र उपलब्ध आणि अवशेष शिल्लक असतील तर अशा वास्तुची पुराभिलेख विभागामार्फत डागडुजी करता येते. या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही तग धरुन आहेत. त्याचे चित्रही उपलब्ध आहे. पावनगडाचा दक्षिण दरवाजा पुन्हा दुरुस्त करून सर्व शिवप्रेमी, गडप्रेमींना पाहता यावा त्याबरोबर पावनगड किल्ल्याची नोंद राज्य पुरातत्त्व खात्याच्या यादीत करावी, अशी मागणी श्री शिवाजी मºहाठा फौंडेशनच्यावतीने केली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFordफोर्ड