अस्मिता पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतीचे पुण्यात प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 02:54 PM2019-11-08T14:54:55+5:302019-11-08T14:57:39+5:30

कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन मंगळवार (दि. १२)पर्यंत खुले राहणार आहे.

Exhibition of Asmita Potdar's embroidery work in Pune | अस्मिता पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतीचे पुण्यात प्रदर्शन

 कोल्हापुरातील हस्तकलाकार अस्मिता पोतदार यांचे भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यात भरले असून, त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Next
ठळक मुद्देअस्मिता पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतीचे पुण्यात प्रदर्शनमंगळवारपर्यंत सुरू राहणार: दर्पण आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात १३० कलाकृती

कोल्हापूर : कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन मंगळवार (दि. १२)पर्यंत खुले राहणार आहे.

भरतकाम या हस्तकलेतून चित्रे साकारण्यात अस्मिता पोतदार यांनी प्रावीण्य मिळविले आहे. आजपर्यंत त्यांनी पांढऱ्या केसांपासून महात्मा गांधी आणि काळ्या केसांपासून मदर तेरेसा यांची व्यक्तिचित्रे साकारली आहेत.

चांदीच्या तारेपासून अशोकस्तंभ, तर तांबे व चांदीच्या तारेपासून नर्तिका साकारली आहे. या प्रदर्शनात या चित्रांबरोबरच देशातील महनीय व्यक्तिमत्त्व असलेले सचिन तेंडुलकर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बाळासाहेब ठाकरे, राजस्थानी शेतकरी, मेंढपाळ, नववधू, नेपाळी व्यक्ती, आदी व्यक्तिचित्रांसह निसर्गचित्रांचाही समावेश आहे.
 

 

Web Title: Exhibition of Asmita Potdar's embroidery work in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.