वीजबिल माफ करा, अन्यथा कोल्हापूर बंद, वीजबिल भरणार नाही- कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 16:13 IST2021-02-15T16:05:28+5:302021-02-15T16:13:40+5:30
Mahavitran kolhapur- लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करण्याची मागणी वारंवार करूनही महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. लोकभावना विचारात घेऊन वीज माफ करावे, अन्यथा कोल्हापूर बंद असे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला. समितीची रविवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

वीजबिल माफ करा, अन्यथा कोल्हापूर बंद, वीजबिल भरणार नाही- कृती समिती
कोल्हापूर : लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करण्याची मागणी वारंवार करूनही महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. लोकभावना विचारात घेऊन वीज माफ करावे, अन्यथा कोल्हापूर बंद असे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला. समितीची रविवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
लॉकडाऊनमधील सहा महिन्यांचे वीजबिल वसुली करू नये, अशी मागणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही कर्मचारी थकबाकीच्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याचा मनमानी कारभार करत आहेत. जनता याविरोधात स्वस्थ बसणार नाही. आंदोलनाची धग कायम ठेवू किंबहुना आंदोलन आणखी व्यापक केले जाईल, असा निर्णयही या बैठकीत झाला. यावेळी बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, सुभाष जाधव, निवास साळोखे, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.