नेसरी परिसरात महाशिवरात्री उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:43 IST2021-03-13T04:43:00+5:302021-03-13T04:43:00+5:30

काशिलिंग मंदिरात पुरोहित संतोष जोशी, सतीश जोशी, रणजित पाटील, सुहास गुरव आदींच्या हस्ते महाअभिषेक, पूजाआर्चा, आरती व धार्मिक कार्यक्रम ...

In the excitement of Mahashivaratri in Nesari area | नेसरी परिसरात महाशिवरात्री उत्साहात

नेसरी परिसरात महाशिवरात्री उत्साहात

काशिलिंग मंदिरात पुरोहित संतोष जोशी, सतीश जोशी, रणजित पाटील, सुहास गुरव आदींच्या हस्ते महाअभिषेक, पूजाआर्चा, आरती व धार्मिक कार्यक्रम झाला.

प्रतापराव गुर्जर स्मारकस्थळी प. म. देवस्थान समितीचे माजी कोषाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, भैय्यासाहेब कुपेकर, सरपंच धोंडीबा नांदवडेकर आदींच्याहस्ते धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.

यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गडहिंग्लज व नेसरी शाखेचे घोषवादन व बौद्धिक मार्गदर्शन असा कार्यक्रम झाला. शिवपुतळ्याचे पूजन जिल्हा कार्यवाह दत्तात्रय गर्गे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण, ध्वजवंदनाबरोबरच घोषवादन करून सातवीरांना अभिवादन केले. संघाच्या बौद्धिक विभागाचे प्रमुख भानुदास साळुंखे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील प्रतापराव गुर्जर स्मारकस्थळी बौद्धीक मार्गदर्शन करताना 'आरएसएस'चे भानुदास साळुंखे. यावेळी शिव भक्तांसह स्वयंसेवक उपस्थित होते.

क्रमांक : ११०३२०२१-गड-०७

Web Title: In the excitement of Mahashivaratri in Nesari area