कुरुंदवाडमध्ये बाॅम्बसदृश वस्तूने शहरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:48+5:302021-03-24T04:23:48+5:30
दरम्यान, ही वस्तू घेऊन येणार्या सांगलीच्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस त्या व्यक्तीची कसून चौकशी करत ...

कुरुंदवाडमध्ये बाॅम्बसदृश वस्तूने शहरात खळबळ
दरम्यान, ही वस्तू घेऊन येणार्या सांगलीच्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस त्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. रात्री साडेअकराच्या सुमारास बाॅम्ब शोधक पथकाने बंदुकीतून गोळी झाडून बाॅम्बसदृश वस्तू निकामी केली अन् पोलिसांसह शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास एक ५५ वर्षीय व्यक्ती हातात गुच्छसारखी वस्तू घेऊन थिएटर चौकातील महाडिक हाॅटेलजवळ रिक्षाने आली. ती हाॅटेलमालकाला शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांना गिफ्ट द्या असे सांगून जात असताना हाॅटेल मालकाला संशय आल्याने त्या व्यक्तीला थांबवून पोलिसांना बोलावून घेतले. गिफ्टमध्ये इलेक्ट्रिक वायर, घड्याळ दिसत असल्याने पोलिसांनी ती वस्तू तबक उद्यानात नेवून ठेवली व बाॅम्ब शोधक पथकाला पाचारण केले. रात्री साडेदहाच्या सुमारास बाॅम्ब शोधक पथक येऊन वस्तूची पाहणी केली. मात्र, नेमके अंदाज येत नसल्याने अखेर बंदुकीतून
गोळी झाडून बाॅम्बसदृश वस्तू निकामी केली.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुणी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट-
यंत्रणा वैतागली आहे
दत्तवाड, ता. शिरोळ येथील फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूर पोस्ट झाल्याने जिल्ह्यातील
पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे येथील पोलीस ठाण्यातील
पोलिसांना चार दिवसांपासून झोप नाही. हे प्रकरण शांत होत असतानाच शहरात
बाॅम्ब सापडल्याने पोलीस यंत्रणा वैतागली आहे.