शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:41 IST

राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा

रमेश सुतारगणेशवाडी (कोल्हापूर) : मी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागामधून सचिव बोलतोय, तुमचं नाव राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कारांसाठी निवडले असून तुम्हाला शासनाच्यावतीने पुरस्कार व रोख रक्कम २५ लाख रुपये मिळणार आहेत. तुमची फाईल तयार आहे. माझ्या गुगल पे नंबरवर ५० हजार रुपये पाठवा, असे फोन गावोगावच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचांना येत आहेत. शिरोळ तालुक्यातील अनेक सरपंचांनाही असे फोन आले आहेत.औरवाडचे लोकनियुक्त सरपंच शफी पटेल यांना मोबाईल (क्रमांक ८६९८७८२७१०) वरून फोन आला. हा फोन माने नावाने नोंद आहे. त्यात मी सामान्य प्रशासन विभागामधून बोलतोय शिरोळ तालुक्यातील २६ पैकी तीन गावांतील सरपंचांची नावे राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कारांसाठी निवडली आहेत. त्यात औरवाडमधून तुमची निवड झाली आहे. तुमचा प्रस्ताव आमच्याकडे अगोदरच्याच सरपंचांनी दिला आहे. तुम्हाला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा, असे सांगण्यात आले. सरपंच पटेल यांनी पुरस्काराबद्दल अधिक चौकशी केल्यावर त्या व्यक्तीने टाळाटाळ केली. त्यामुळे पटेल यांना शंका आली. त्यांनी ग्रामसेवक बी. एन. केदार यांना विचारणा केली असता पुरस्कारासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही सूचना अथवा पत्र आले नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये माहिती घेतली असता राज्य शासनाकडून असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले. याअगोदरही तालुक्यातील सरपंचांची पुरस्कार देतो म्हणून फसवणूक झाली आहे. मात्र, बदनामीमुळे कोणी सांगण्यास पुढे आलेले नाही.

राज्य शासन पुरस्कारांसाठी कधीही पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे खात्री केल्याशिवाय अशा फोन कॉलना प्रतिसाद देऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. - शंकर कवितके, गटविकास अधिकारी, शिरोळ, जि.कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीsarpanchसरपंच