शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लहान असलो तरी पाडायचे आणि जिंकवायचे कुणाला, आमच्याच हातात; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:18 IST

आगामी निवडणुकांमध्ये वाटा द्या

कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षाने आतापर्यंत ज्यांना साथ दिली ते पक्ष सत्तेवर आले आहेत. आमचा पक्ष छोटा पक्ष असला तरी निडवणुकांमध्ये पाडायचे कुणाला आणि जिंकवायचे कुणाला हे आमच्या हातात आहे, तेवढी ताकद आमच्याकडे आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. महायुतीत मी समाधानी परंतु कार्यकर्ते असमाधानी असल्याची टिप्पणी त्यांनी केली.मंत्री आठवले म्हणाले, राज्यात लवकरच महामंडळांचे वाटप होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आरपीआय कार्यकर्त्यांची यादी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध महामंडळे, जिल्हा नियोजन समितीमध्ये २५ टक्के वाटा आरपीआयला द्यावा. आम्ही भाजपच्या कोट्यातून असल्याने आम्हाला भाजपने या जागा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.अन्याय अत्याचारांचा मुकाबला करणाऱ्या दलित पँथर या आक्रमक संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार करत आहोत. आजची तरुण पिढी केवळ व्हॉट्सॲप, फेसबुकवर आपला राग व्यक्त करते. या नव्या पिढीला पुन्हा सामाजिक क्रांतीच्या आंदोलनात उभे करण्यासाठी नव्या पिढीच्या हाती दलित पँथरचे संघटन देण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.विधानसभेच्या १२ जागा द्याभाजपसोबत गेल्यानेच आरपीआय पक्ष देशभर वाढला. नागालँडमध्ये दोन आमदार आहेत. इतरही राज्यातही पक्षाचे आमदार आहेत. भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या १२ जागा दिल्यास राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून आरपीआयची नोंदणी होईल, असेही आठवले म्हणाले.