एक शेतकरी जरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:30 PM2020-06-23T15:30:08+5:302020-06-23T15:33:07+5:30

जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बँकेने घेतली असून, एक जरी शेतकरी वंचित राहिला तर कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजप नेत्यांना दिले. राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आंदोलनाचा कोल्हापुरातच फज्जा उडाल्याची टीकाही त्यांनी केली.

Even if a farmer is deprived of a loan, he will suffer any punishment | एक शेतकरी जरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीन

एक शेतकरी जरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीन

Next
ठळक मुद्देएक शेतकरी जरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीनहसन मुश्रीफ यांचे भाजप नेत्यांना खुले आव्हान

कोल्हापूर : जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बँकेने घेतली असून, एक जरी शेतकरी वंचित राहिला तर कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजप नेत्यांना दिले. राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आंदोलनाचा कोल्हापुरातच फज्जा उडाल्याची टीकाही त्यांनी केली.

वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती आधी घ्यायला हवी होती. ही माहिती घेऊन त्यांनी जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेले नाही, तिकडे हे आंदोलन करायला हवे होते. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन बँकांसमोर करण्याचा निर्णय भाजपने घेतला असताना कोल्हापुरात मात्र हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यावरूनच त्यांच्यावर ओढलेली नामुष्की आणि त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाची हवाच गेल्याचे स्पष्ट होते. जिल्हा बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकाही शेतकऱ्यांना कर्ज देते, मग येथे आंदोलन कशासाठी? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकातून केला.

जिल्हा बँकेचे १५८ टक्के पीककर्ज वाटप

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समन्वय समितीने जिल्हा बँकेला २०२०-२०२१ या हंगामासाठी खरीप ६८६ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र जिल्हा बँकेने १०८२ कोटी पीक कर्ज वाटप केले. उद्दिष्टाच्या १५८ टक्के कर्ज वाटप करून बँकेने राज्यात अव्वल स्थान पटकावले. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचे पैसे आले नसतानाही शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
 

Web Title: Even if a farmer is deprived of a loan, he will suffer any punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.