शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:49 IST

अस्तित्त्वासाठी झुंज

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तरी नेत्यांची मानसिकता बदलत नसल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उद्रेक पाहावयास मिळू लागला आहे. आपापल्या मतदारसंघापुरते राजकारण, वेळ पडल्यास दुसऱ्या मतदारसंघात मित्रत्त्वाचे नाते जोपासणे हे धोरणच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर आल्याने या पक्षाची वाढ खुंटली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची नव्याने स्थापना झाली तरी पदाधिकाऱ्यांचे हे दुखणे मात्र जुनेच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्यातील वजनदार नेत्यांच्या ताकदीवर उभा राहिलेला पक्ष, असेच म्हटले जाते. त्याला कारणेही तशीच असून, प्रत्येक जिल्ह्यातील साखर कारखानदार व सहकारातील बड्या नेत्यांना घेऊन पवार यांनी १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पंधरा वर्षे पक्ष सत्तेत राहिला. त्या सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष मजबुतीने उभा राहणे अपेक्षित होते.पण, प्रत्येक जिल्ह्यात या नेतेमंडळींनी सत्तेच्या ताकदीचा वापर आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवल्याने पक्ष मजबुतीने वाढलाच नाही. त्यामुळे चार जिल्ह्यांपुरता राष्ट्रवादी काँग्रेस असे हिणवले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी नवीन राष्ट्रवादीची स्थापना केली. एकसंध असताना अडचणीत असलेल्या पक्षाला फुटीनंतर आता कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात तर एकसंध राष्ट्रवादी असताना आमदार, खासदारांचा आलेख खाली आला. आपल्या मतदारसंघापुरतेच बघायचे, हे नेत्यांचे धाेरणच पक्षाला मारक ठरले. फुटीनंतरही तोच कित्ता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने गिरवला, ‘कागल’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ या विधानसभेच्या तीन जागा लढवल्या, हे मतदारसंघ सोडून पक्षाचे नेते इतर मतदारसंघात लक्ष देत नाहीत, असा थेट आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला.आवळे यांच्या आरोपात तथ्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असतानाही ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’ सोडले, तर इतर सात मतदारसंघात नेत्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी पक्ष अस्तित्वशून्य बनले. फुटीनंतरही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फारसा बदल झाला नाही, हे वास्तव आहे.

सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाहीराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, यामध्ये २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२३ हा सहा वर्षाचा कार्यकाळ सोडला तर अखंडपणे पक्ष सत्तेत आहे. पक्षच नव्हे, काही नेतेच सत्तेत राहिले आहेत. एकूण वाटचाल पाहिली तर सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाही, असेच चित्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात आहे.

राजीव आवळे यांची खदखद योग्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असताना या चुका झाल्याने पक्ष वाढीवर मर्यादा आल्या. मात्र, आता तसे होणार नाही. प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका आमची आहे. - आर. के. पोवार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)