शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

जानेवारी उजाडला तरी महसूल वसुली ५८ टक्क्यांवरच, महापुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:45 PM

महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. सर्व नायब तहसीलदार व वसुली लिपिकांना याबाबत जिल्हाप्रशासनाकडून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देउद्दिष्ट पूर्तीसाठी पुढील दोन महिने होणार पळापळ जिल्हा प्रशासनाकडून नायब तहसीलदार, वसुली लिपिकांना सक्त सूचना

प्रवीण देसाई

कोल्हापूर : महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. सर्व नायब तहसीलदार व वसुली लिपिकांना याबाबत जिल्हाप्रशासनाकडून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण ८५ कोटी ५८ लाख रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये जमीन महसूल व गौण खनिज (वाळू, मुरूम) महसूल वसुलीचा समावेश आहे. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यांत ३१ डिसेंबरपर्यंत ४९ कोटी ५५ लाख ३९ हजार म्हणजे ५५.२८ टक्के इतकी वसुली झाली आहे. वास्तविक डिसेंबरपर्यंत ७० टक्के व जानेवारीपर्यंत ८० टक्के वसुली होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने ते साध्य केले आहे.परंतु जुलै, आॅगस्ट महिन्यांतील महापूर व आॅक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा फटका वसुलीला बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने शासनस्तरावरूनही जादा सक्ती करण्यात आलेली नाही; परंतु जिल्हा प्रशासनाकडून वसुलीसंदर्भात जिल्हापातळीवर दररोज आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन महिन्यांत ही उद्दिष्टपूर्ती होते का? हे पाहावे लागणार आहे.

आजरा तालुक्याने १०६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेआजरा तालुक्याने डिसेंबर महिन्यातच आपले एकूण १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या तालुक्याची उद्दिष्टपूर्ती १०६ टक्के इतकी झाली असून, डिसेंबरमध्येच शंभरी गाठणे हे एकमेव आजरा तालुक्यालाच शक्य झाले आहे.१५ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशअपेक्षित उद्दिष्टपूर्ती न झाल्याने नुकतीच उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी सर्व तालुक्यांतील नायब तहसीलदार व वसुली लिपिकांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यांना १५ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के वसुली झाली पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. इथून पुढे दररोज आढावा घेतला जाईल, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.तालुकानिहाय एकूण उद्दिष्ट व वसुली (डिसेंबर २०१९अखेर)तालुका               एकूण                     उद्दिष्ट                       वसुली                         टक्केवारीकरवीर               २५ कोटी ६१ लाख    ६२ हजार ८ कोटी     ८३ लाख ९८ हजार        ३४.५१गगनबावडा        १ कोटी ५० लाख                                      ४४ लाख ८३ हजार        २९.८९कागल               ६ कोटी ५० लाख      ४ कोटी ९० लाख        ११ हजार                     ७४.५०राधानगरी          ३ कोटी ४५ लाख      २ कोटी २६ लाख       ३३ हजार                      ६५.६०पन्हाळा              ५ कोटी २५ लाख     १ कोटी ६१ लाख        ९ हजार                       ३०.६८शाहूवाडी             ३ कोटी ५१ लाख     २ कोटी ३९ लाख        ८६ हजार                     ६८.२५भुदरगड              ४ कोटी २५लाख      २ कोटी ५९ लाख        ५२ हजार                     ६१.०६आजरा               ४ कोटी २५लाख       ४ कोटी ७० लाख        २६ हजार                     ११.६५हातकणंगले   २१ कोटी ५६ लाख ९१ हजार  ५ कोटी ९८ लाख   १ हजार                   २७.७३शिरोळ               ११ कोटी ५० लाख        ६ कोटी ५१ लाख        ७ हजार                   ५६.६०गडहिंग्लज           ६ कोटी ५० लाख        ३ कोटी २३ लाख       ७२ हजार                 ४९.७३चंदगड               ४ कोटी ५० लाख          ३ कोटी ९ लाख         ८६ हजार                ६८.८३ 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर