शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिने उलटले तरी पीएच.डी फेलोशिपचा प्रश्न रखडलेलाच; सारथी, बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:09 IST

तीन हजार ४७३ विद्यार्थ्यांवर अन्याय

कोल्हापूर : गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून सारथी, बार्टी व महाज्योतीचा संशोधक विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप मिळावी म्हणून बेमुदत साखळी उपोषण, लक्षणीय आंदोलन व मोर्चे काढले. मात्र, राज्य सरकारने यावर कोणताच निर्णय न घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष उफाळला आहे. पक्षाच्या अध्यक्षांना गाड्या घेण्यासाठी २५ लाख रुपये आहेत. मात्र, संशोधन करू इच्छिणाऱ्यांना पाच वर्षांसाठी २५ लाख देऊ शकत नाही, या शब्दांत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.सरकारने ३० ऑक्टोबरचा जीआर काढत समान धोरणाच्या नावाखाली सारथी, बार्टी व महाज्योती संस्थेचा स्वायत्त दर्जा, अधिकार काढून घेतले. त्यातून संशोधक विद्यार्थ्यांच्या २०२३ बॅचच्या पीएच. डी. फेलोशिपच्या प्रत्येक संस्थेसाठी २०० जागा केल्या. सारथीकडून याआधी केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती; पण २०२३ मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात सीएसएमआरएफ - २०२३च्या जाहिरातीत कोणताही परीक्षा व जागेचा उल्लेख नसताना नंतर वारंवार संस्थेकडून नियमांमध्ये बदल करत २०० जागा व सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.जागा कमी झाल्याने अनेकांना ही फेलोशिप मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरसकट टप्पेवारीने सर्वांना फेलोशिप दिली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही.

३ हजार ४७३ विद्यार्थ्यांवर अन्यायअर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेलोशिपवर कोणतेही भाष्य न करता फक्त चारही संस्थांमध्ये समान धोरण राबवीत असल्याचे सांगितले. यामुळे तिन्ही संस्थांमधील ३ हजार ४७३ या संशोधक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना फिलोशिप न मिळाल्यामुळे पीएच. डी.चे शिक्षण बंद करावे लागणार असल्याचे सारथी कृती समिती अध्यक्ष संभाजी खोत, बाबूराव माने, राहुल निकम व सौरभ पवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात संशोधन क्षेत्रासाठी सारथीसाठी कोणतीही भरीव आर्थिक तरतूद केली नाही. अजित पवार यांनी पक्षातील अध्यक्षांना जशा मोठ्या मनाने २५ लाखांच्या गाड्या वाटप केल्या, त्याच मोठ्या मनाने महाराष्ट्रातील सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरकारी तिजोरीतून पाच वर्षांच्या संशोधन कार्यासाठी २५ लाखांची फेलोशिप देऊन न्याय मिळवून द्यावा. - संभाजी खोत, अध्यक्ष, सारथी कृती समिती, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधनStudentविद्यार्थी