‘मूल्यांकन’ अहवालास जुलै उजाडणार

By Admin | Updated: June 15, 2015 00:41 IST2015-06-15T00:41:04+5:302015-06-15T00:41:57+5:30

तीन रस्त्यांची तपासणी पूर्ण : तपासणीसाठी चार दिवसांचा अवधी लागणार

The 'evaluation' report will be launched in July | ‘मूल्यांकन’ अहवालास जुलै उजाडणार

‘मूल्यांकन’ अहवालास जुलै उजाडणार

कोल्हापूर : रस्ते प्रकल्पातील काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर नोबल एंटरप्रायजेस व मूल्यांकन समितीच्या सदस्यांनी दोन दिवसांपासून प्रकल्पांतर्गत केलेल्या रस्त्यांचे स्तर (लेअर) तपासणीस सुरुवात केली. संभाजीनगर ते क्रशर चौकादरम्यान रस्त्यांची रविवारी तपासणी केली. आठपैकी तीन रस्त्यांची तपासणी पूर्ण झाली असून, हे काम पूर्ण होण्यास किमान चार दिवसांचा अवधी लागणार आहे. शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन व चाचणी करण्याचे काम सुरू असल्याचे प्रकल्पाची किंमत ठरण्यास जुलै महिना उजाडणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘आयआरबी’ने केलेले काँक्रिटचे रस्ते हे कराराप्रमाणे नाहीत. ठेकेदाराने ‘एम-फोर्टी ग्रेड’चे कॉँक्रिट न वापरता ‘एम-टेन ते एम-टष्ट्वेंटी ग्रेड’चे वापरल्याचे मूल्यांकन समितीसमोर सादर केलेल्या ‘टेस्ट रिपोर्ट’मधून समोर आले होते. डांबरी रस्त्यांसाठी ‘आयआरबी’ने मुरूम व खडीच्या वापरलेल्या स्तर (लेअर)ची तपासणी केली. प्रमुख आठ रस्त्यांवर दोन बाय दोन फूट रुंद, तसेच चार फूट खोल खुदाई करून तपासणी सुरू आहे. प्रकल्पाचे मोजमाप, दर्जा व फेरतपासणी यास अवधी लागणार असून, मूल्यांकन अहवालासाठी २० जूनचा मुहूर्त साधता येणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अहवाल तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The 'evaluation' report will be launched in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.