केळीपासून इथेनॉल निर्मिती नंबर वन

By Admin | Updated: January 16, 2015 00:16 IST2015-01-15T23:45:50+5:302015-01-16T00:16:44+5:30

विज्ञान प्रदर्शनाची सांगता : वालावलकर शाळेचा विद्यार्थी ठरला विजेता

Ethanol production number one from Banana | केळीपासून इथेनॉल निर्मिती नंबर वन

केळीपासून इथेनॉल निर्मिती नंबर वन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे शिंगणापुरातील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये तीन दिवस झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोल्हापुरातील शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचा विद्यार्थी माधव कदम याचे ‘केळीच्या सालापासून इथेनॉलनिर्मिती’ या उपकरणाला प्राथमिक गटातून पहिला क्रमांक मिळाला. दरम्यान, आज विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, उपशिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गटनिहाय अनुक्रमे विजेते, कंसात शाळा आणि उपकरणाचे नाव असे : प्राथमिक विद्यार्थी गट - हर्षवर्धन पोळ (न्यू इंग्लिश स्कूल माले, आदर्श गाव), यश तिडके (जयाप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल, शिरोळ, सॉल्ट वॉटर एनर्जी), श्रीरंग डकरे (सा.कृ.पंत हायस्कूल, कोल्हापूर, सोलर ट्रॅक्टर), वैष्णवी कलंगुडे (भारत विद्यामंदिर, रूई, शेतीतील अग्नी नियंत्रण यंत्र), राजलक्ष्मी पाटील (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर, वीज बचत घर).
माध्यमिक विद्यार्थी गट - निखिल पाटील (जाखले हायस्कूल, स्नायू उर्जेचे रूपांतर), आेंकार सुतार (श्रीमंत राजर्षी शाहू हायस्कूल, म्हाळुंगे, उर्जा साधणे कृषी यंत्र), पांडुरंग किरूळकर (भाऊराव पाटील हायस्कूल, आवळी खुर्द, कचरा स्वच्छता व कीटकनाशक धुरळणी यंत्र), अनुराग लांबोर (साधना हायस्कूल गडहिंग्लज, पेट्रो केरो गॅस), सुहास पाटील (महात्मा फुले हायस्कूल, कोळवण, आयडीयल बाईक), सलमान सय्यद (रमजानसेठ बांधार विद्यालय, बाहुबली)
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधन निर्मिती गट - एन. ए. साळे (स्वामी स्वरूपानंद विद्यालय तिरपण, युजर फ्रेंन्डली प्रोजेक्टर), अविनाश चौगुले (एम. जी. शहा हायस्कूल, बाहुबली, हॅन्डी प्रोजेक्टर कम मायक्रोस्कोप), आर. जे. पाटील, न्यू इंग्लिश, कोतोली, मॅजिक बॉक्स).
प्राथमिक शिक्षक गट- व्दारकानाथ भोसले (कुमार विद्यामंदिर शिरोली, बहुउद्देशीय फिरती पेटी), सदाशिव खोत (विद्यामंदिर तिरपण, ज्ञानमंदिर), शशिकला पाटील, (विद्यामंदिर हेळेवाडी, झीरो बजेट मॅथ्स् लॅब).
प्रयोगशाळा सहायक गट - वसंतराव पोवार (कळंबा गर्ल्स हायस्कूल, थ्रीडी तक्ते), दादा मगदूम (एम. पी. शहा विद्यालय, बाहुबली, प्रायोगिक साधणे स्वच्छता किट), एस. एस. भोसले (लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर, हसत खेळत विज्ञान शिक्षण).
लोकसंख्या शिक्षण गट - प्रशांत गुरव (विद्यामंदिर इचलकरंजी, अंधश्रद्धा निमूर्लन), दस्तगिर उस्ताद (विद्यामंदिर कुमार विद्यालय, कुदनूर, खेळातून लोकसंख्या आणि व्यसनाधिनता), विद्या कुलकर्णी (विद्यामंदिर बामणे, जलसाक्षरता). माध्यमिक गट - अशोक जाधव, (उत्तूर विद्यालय, एक पाऊल स्वच्छतेकडे), सुनील सुतार (एस. एस. हायस्कूल, नेसरी, लोकसंख्या शिक्षण). अजिम मुल्ला (कोडोली हायस्कूल, अंधश्रद्धा, यश व्यसनमुक्ती).
दरम्यान, विद्यार्थी गटातून
पहिले तीन क्रमांक मिळविलेल्या आणि शिक्षक गटातील पहिल्या क्रमांकाच्या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Web Title: Ethanol production number one from Banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.