जिल्हा पोलीस दलातर्फे ‘सैनिक सेल’ स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:11+5:302021-08-15T04:26:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या सीमेवर भारतमातेचे संरक्षण करणाऱ्या जवानाचे गावाकडे वयोवृद्ध आई-वडील व इतर नातेवाईक राहत असतात. ...

जिल्हा पोलीस दलातर्फे ‘सैनिक सेल’ स्थापन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशाच्या सीमेवर भारतमातेचे संरक्षण करणाऱ्या जवानाचे गावाकडे वयोवृद्ध आई-वडील व इतर नातेवाईक राहत असतात. त्यांच्या अडीअडचणी व तक्रारींबाबत ते स्वतः हजर राहू शकत नाहीत. याकरिता कोल्हापूर पोलीस दलातर्फे अधीक्षक कार्यालयात ‘सैनिक सेल’ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शनिवारी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठी सैन्यपरंपरा आहे. युवक मोठ्या प्रमाणात सैन्यदल, स्थलसेना, नौसेना, वायुसेना, बीएसएफ, सीआरपीएफ आदी लष्करी व निमलष्करी दलांमध्ये कार्यरत आहेत. ते जवान आपल्या तक्रारी स्वतः किंवा अप्रत्यक्षरित्या सैनिक सेलमध्ये येऊन देऊ शकत नाहीत. असे आजी-माजी सैनिक आपली तक्रार ई-मेलद्वारे अथवा व्हॉट्सॲपद्वारेदेखील देऊ शकतात. या तक्रारीचे या सेलमध्ये पर्यवेक्षण पोलीस अधीक्षक हे स्वतः करणार असून, निराकरण त्वरित केले जाणार आहे.
या क्रमांकावर E mail. Sp.kop@mahapolice.gov.in
What's App मोबाईल क्रमांक ७२१८०३८५८५ किंवा ०२३१२६६२३३ संपर्क साधावा, असेही आवाहन पोलीस दलातर्फे केले आहे.