शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:46 IST

कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट ...

ठळक मुद्देमहापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणीमहापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनकडून बायोसॅनिटेशनची प्रक्रिया

कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे काम महानगरपालिका, असोसिएशन आॅफ अर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर यांच्याद्वारे गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यात बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी झूम प्रकल्पात येणाऱ्या नव्या कचऱ्यावर केली जात आहे.पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेला कचरा मोठ्या प्रमाणात झूम प्रकल्पामध्ये येत आहे. साधारणत: रोज एक टन कचरा या प्रकल्पामध्ये टाकण्यात येत आहे. त्यात कापसाच्या गाद्या, धान्य, कपडे, कागदी बॉक्स, फर्निचर, आदींचा समावेश आहे.

हा कचरा कुजणे सुरू झाले आहे. त्यातून लिंचेट बाहेर पडत असल्याने या कचऱ्यांच्या दुर्गंधीची तीव्रता अधिक आहे. ही दुर्गंधी कमी करणे तातडीने गरजेचे होते. फॉगिंग मशीन, अन्य रसायने यांच्या वापरावर मर्यादा होत्या; त्यामुळे या कचऱ्यांची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सने पाऊल टाकले आहे. बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी अग्निशमन दलाच्या चार टँकरद्वारे या कचऱ्यांवर केली जात आहे; त्यामुळे कचऱ्यांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होत आहे.

कम्पोस्ट खतामध्ये रूपांतरबायोसॅनिटेशन आणि कल्चर यांच्या फवारणीमुळे महापुरातील कचऱ्याची दुर्गंधी साधारणत: ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. या फवारणीमुळे संंबंधित कचऱ्यातील विषारी वायू शोषले जाते आणि आॅक्सिजन हवेत सोडला जातो. या कचऱ्यांचे विघटन होऊन दोन महिन्यांत त्याचे कम्पोस्ट खत तयार होते. पर्यावरणपूरक पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

झूम प्रकल्पातील कचऱ्यावर गुरुवारपासून फवारणी करण्यात येत आहे. महापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे काम सुरू आहे; त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत झाली असल्याचे असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले.

महापुरामुळे निर्माण झालेला कचरा झूम प्रकल्प येण्याचे कमी होईपर्यंत संबंधित फवारणी केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेसाठी या प्रक्रियेचा उपयोग केला जाणार असल्याचे कोराणे यांनी सांगितले.

लिंचेट बाहेर पडून दुर्गंधीमहापुराच्या पाण्यातील सर्व कचरा भिजलेला आहे. शिवाय तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; त्यामुळे त्यातून लिंचेट बाहेर पडून दुर्गंधी सुटलेली आहे; त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ते टाळण्यासाठी संबंधित फवारणी करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर