मातीशी नाते जपणारा उद्योजक : अण्णासाहेब चकोते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:31+5:302021-03-24T04:23:31+5:30
सन १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ३० वर्षाचा वटवृक्ष असून पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नवे छोटेसे रोपटे लावले आहे. ...

मातीशी नाते जपणारा उद्योजक : अण्णासाहेब चकोते
सन १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ३० वर्षाचा वटवृक्ष असून पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नवे छोटेसे रोपटे लावले आहे. अण्णासाहेब यांनी कामाचे नियोजन, व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील बारकावे, मार्केटिंगची कलासुद्धा अगदी सहजपणे पार पाडली आहे. युरोपियन राष्ट्रे , जर्मन, चीन, मलेशिया, सिंगापूर, दुबई, आदी ठिकाणी सातासमुद्रापार जाऊन त्यांनी बेकरी उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली आहे. १५० नव्या उद्योजकांना त्यांनी या आउटलेटच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे कंपनीबरोबर एक नातं असलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. दिवसभराच्या कामात ते कधी कंटाळत नाहीत; पण रात्री ते वाचन, अध्यात्माचे श्रवण करतात. बेकरी उद्योगातील अल्पावधीत कारकिर्द लक्षात घेऊन भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योगने नवी दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योगमंत्री सुबोधकांत सहाय यांच्या हस्ते उद्योग विभूषण अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिला जाणारा यशस्वी उद्योग पुरस्कारही प्रदान करण्यात आला. सध्या ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून देशभरातील बेकरी उद्योगांसाठी योगदान देत आहेत. यशस्वी उद्योजक बनल्यानंतरही समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न त्यांनी सामाजिक कार्यातून केला आहे. कामगारांप्रती आत्मीयता, सामाजिक कार्यासाठी सुरू असणारी धडपड पाहिल्यास एक परिपूर्ण उद्योगपती म्हणून चकोते यांचा उल्लेख होतो. त्यांच्या विशाल उत्तुंग याचाही पायाभरणीच केली आहे. त्यांच्या या उद्योगाच्या भरारीसाठी व समाजाच्या उन्नतीसाठी कारण ठरलेल्या अण्णासाहेबांना दीर्घायुष्य लाभो...!
(प्रतिनिधी)
फोटो - २३०३२०२१-जेएवाय-०४-अण्णासाहेब चकोते