उद्योजक अमर डोंगरे बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:29+5:302020-12-22T04:23:29+5:30

महापूर, कोरोना, तेजी-मंदी व सूत दरवाढ या पार्श्वभूमीवर येथील वस्त्रोद्योग सतत अडचणीत सापडत आहे. त्यामुळे कारखाने बंद ठेवणे व ...

Entrepreneur Amar Dongre goes missing | उद्योजक अमर डोंगरे बेपत्ता

उद्योजक अमर डोंगरे बेपत्ता

महापूर, कोरोना, तेजी-मंदी व सूत दरवाढ या पार्श्वभूमीवर येथील वस्त्रोद्योग सतत अडचणीत सापडत आहे. त्यामुळे कारखाने बंद ठेवणे व आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. अनेकांनी या परिस्थितीतून मार्ग काढून उभा राहण्याचा प्रयत्न केला, तर अनेकजणांनी या अडचणीतून स्वत:ला संपवून घेतले. शहरामध्ये कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लॉकडाऊन व अनलॉक यामध्ये कारखाने बंद ठेवण्यात आले. अनलॉकनंतर सुरू झालेल्या कारखान्याला कामगार पुरवठा न झाल्याने पुन्हा कारखाने बंद ठेवण्यात आले. यातच तेजी-मंदी व सध्या सूत दरवाढीसंदर्भात आंदोलने सुरू आहेत.

दरम्यान, उद्योजक अमर डोंगरे हे सोमवारी सकाळी मोटारसायकल (एमएच ०९ डीएल ८९१९) वरून घरातून बाहेर पडले होते. दुपारपर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ न शकल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नातेवाइक, मित्र व पोलिसांनी शोधाशोध केली असता त्यांची मोटारसायकल पंचगंगा नदीघाटावर गणपती मंदिरजवळ आढळली. डोंगरे हे अचानक बेपत्ता झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: Entrepreneur Amar Dongre goes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.