मुरगूडमध्ये कोरोना रुग्णांचे मनोरंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:36+5:302021-06-27T04:17:36+5:30
मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड उपचार केंद्र सुरू झाले. या केंद्रामध्ये अत्यवस्थ असणाऱ्या ७२ वर्षे वयाच्या एका महिलेने रोगावर मात ...

मुरगूडमध्ये कोरोना रुग्णांचे मनोरंजन
मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड उपचार केंद्र सुरू झाले. या केंद्रामध्ये अत्यवस्थ असणाऱ्या ७२ वर्षे वयाच्या एका महिलेने रोगावर मात करीत नुकताच डिस्चार्ज घेतला. सध्या या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची गायन सेवा करण्याचे ठरले. आज रुग्णालयातील रुग्णांनी रणजित कदम व सहकलाकार यांनी सादर केलेल्या कराओकेच्या गाण्यांच्या तालावर ठेका धरला.
कार्यक्रमात रणजीत कदम यांनी ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, ‘नाम गुम जायेगा’, ‘पल पल दिल के पास’, ‘विठू माऊली’, ‘गारवा’, ‘छुकर मेरे मन को’, ‘भोले हो भोले’, ‘तेरे जैसा यार कहा’ तर अभियंता आकाश दरेकर यांनी ‘जिए तो जिए कैसे’ आणि विनायक रणवरे यांनी ‘तुमसे मिलके’ ही गाणी सादर केली.
कोरोना लागू झाल्यामुळे गर्भगळीत झालेल्या रुग्णांना काही क्षण का असेना आनंदाचे क्षण मिळावेत या दृष्टीने संयोजकांनी हा गायन सादरीकरणाचा कार्यक्रम केला. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी, डॉ. अमोल पाटील, डॉ. आनंद मोरे, नगरसेवक रविराज परीट, विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.