नाळे कॉलनीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:55+5:302021-02-05T07:09:55+5:30
कोल्हापूर : येथील नाळे कॉलनीत युवकाने भाड्याच्या राहत्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. संग्राम दगडू चव्हाण ...

नाळे कॉलनीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हापूर : येथील नाळे कॉलनीत युवकाने भाड्याच्या राहत्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. संग्राम दगडू चव्हाण (वय ३३, रा. नाळे कॉलनी, कोल्हापूर, मूळ गाव निवडे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संग्राम चव्हाण हा अभियांत्रिकीचा शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. तो नाळे कॉलनी येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. तो अविवाहित असून नोकरीच्या शोधात होता. मंगळवारी त्याने आपल्या खोलीमध्ये छतावरील फॅनच्या हुकाला फेट्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निवडे येथील नातेवाइकांनी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
फोटो नं. ०२०२२०२१-कोल-संग्राम चव्हाण