ऊर्जामंत्री आज कोल्हापूर, सांगलीत,: वीज यंत्रणा दुरुस्तीचा आढावा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST2021-07-30T04:24:43+5:302021-07-30T04:24:43+5:30

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे महावितरण वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापूर व सांगली येथील नुकसानग्रस्त ...

Energy Minister to review power system repair in Kolhapur, Sangli today | ऊर्जामंत्री आज कोल्हापूर, सांगलीत,: वीज यंत्रणा दुरुस्तीचा आढावा घेणार

ऊर्जामंत्री आज कोल्हापूर, सांगलीत,: वीज यंत्रणा दुरुस्तीचा आढावा घेणार

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे महावितरण वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापूर व सांगली येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज शुक्रवारी दिवसभर या परिसराचा दौरा करणार आहेत. वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावाही घेणार आहेत.

डॉ. राऊत हे सकाळी ९ वाजता कराडहून सांगलीत येतील. सकाळी साडेदहा वाजता वाळवा तालुक्यातील दुधगाव व कवठेपिरान, शेरी नाल्यासह सांगली शहरामध्ये पुरामुळे झालेल्या विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी करतील. दुपारी तीन वाजता ते कोल्हापुरात येणार आहेत. बापट कॅम्प, नागाळा पार्क, दुधाळी उपकेंद्र येथील विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. पूरग्रस्तांची विचारपूस करून गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणार आहे.

Web Title: Energy Minister to review power system repair in Kolhapur, Sangli today