रस्त्यावरच आमच्या लढाईचा शेवट - एन.डी. पाटील
By Admin | Updated: February 20, 2017 10:04 IST2017-02-20T09:59:47+5:302017-02-20T10:04:45+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र तपास यंत्रणाकडून ठोस पाऊल उचलण्यात न आल्यानं निषेधासाठी कोल्हापुरात मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं.

रस्त्यावरच आमच्या लढाईचा शेवट - एन.डी. पाटील
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र तपास यंत्रणेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे रस्त्यावरच या लढाईचा शेवट करावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केली.
पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गाने मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या मॉर्निंग वॉकमध्ये विविध मान्यवरांसह मध्य प्रदेश येथील लेखकही सहभागी झाले होते.