महापौरपदासाठी आग्रही : कोरे

By Admin | Updated: July 17, 2014 00:19 IST2014-07-17T00:05:59+5:302014-07-17T00:19:01+5:30

कोरे-मुश्रीफ लवकरच भेट : जनसुराज्य-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

Encouragement for the post of Mayor: Core | महापौरपदासाठी आग्रही : कोरे

महापौरपदासाठी आग्रही : कोरे

कोल्हापूर : महापौर सुनीता राऊत नेत्यांचा आदेश मिळताच राजीनामा देणार, हे स्पष्ट आहे. मात्र, महापौरपदाचा मान राष्ट्रवादीकडे आपल्याकडे राखणार की, मित्रपक्ष असलेल्या ‘जनसुराज्य’ला देणार, याबाबत कमालीची उत्सुकता नगरसेवकांना लागून राहिली आहे.
नव्या महापौरास थेट पाईपलाईन उद्घाटनाचा मान मिळणार आहे. दरम्यान, महापौर ‘जनसुराज्य’चाच व्हावा, यासाठी आग्रही राहणार असून , लवकरच जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीला डिसेंबर २०१४ पर्यंत महापौरपदाची संधी आहे. राष्ट्रवादीला या टर्ममध्ये ही शेवटचीच संधी असल्याने इच्छुक नगरसेविका शारदा देवणे, वंदना आयरेकर, ज्योत्स्ना मेढे-पवार, तृप्ती माळवी यांनी ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ या पद्धतीनेच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. जनसुराज्य पक्षाने गेल्या साडेतीन वर्षांत विरोधी पक्षनेता वगळता मोठे पद स्वीकारलेले नाही. उपमहापौरपदाची आॅफर पक्षाला दिली जाऊ शकते. मात्र, जनसुराज्य महापौरपदावरच ठाम राहिल्यास महापौर निवड रंगतदार होऊ शकते.

Web Title: Encouragement for the post of Mayor: Core