बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या प्राध्यापकास सक्तमजुरी

By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:40:03+5:302014-11-30T00:59:17+5:30

तीन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड

Empowering the professor with a fake certificate | बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या प्राध्यापकास सक्तमजुरी

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या प्राध्यापकास सक्तमजुरी

जयसिंगपूर : बोगस नावाने अभियांत्रिकीचे शैक्षणिक बनावट प्रमाणपत्र तयार करून नोकरीच्या ठिकाणी फसवणूक केल्याप्रकरणी तोतया प्राध्यापकास तीन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालयाने आज, शनिवारी सुनावली. अजित रामचंद्र कुलकर्णी (रा. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव असून, सन २००३ मध्ये जयसिंगपूर येथे ही घटना उघडकीस आली होती.
२० जुलै २००२ ते २७ जानेवारी २००३ या कालावधीत येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात अजित रामचंद्र कुलकर्णी असे नाव असताना श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी असे बोगस नाव धारण करून प्राध्यापक या पदावर काम करीत होता. बी.ई. व एम.ई. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे भासवून कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कोपरगाव गव्हर्न्मेंट कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी काम केले असल्याचे अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र त्याने घेतले होते. त्या आधारे नोकरी मिळवून कॉलेजची फसवणूक केल्याची तक्रार उपप्राचार्य अनिल गुप्ता यांनी पोलिसांत दिली होती.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्ह्याचा
तपास केला होता, तर सात साक्षीदारही तपासण्यात आले होते. या खटल्याचा निकाल आज, शनिवारी जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. टी. पाटणकर यांनी दिला. सरकारी वकील म्हणून रश्मी नरवाडकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Empowering the professor with a fake certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.