शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची ४ टक्के पगार वाढ, मागील फरकही मिळणार

By राजाराम लोंढे | Updated: July 30, 2024 12:39 IST

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना ४ टक्के पगारवाढीचा निर्णय अखेर सोमवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. युनियन व बँक व्यवस्थापनामध्ये याबाबत ५ ऑगस्टला करार केला जाणार असून १ एप्रिल २०१७ पासूनचा ३६ कोटी फरकही दिला जाणार आहे.जिल्हा बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापनामध्ये २००७ मध्ये पगारवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत मार्च २०११ पर्यंत होती. मात्र, बँकेवर २००९ ला प्रशासकीय मंडळ आल्याने पुन्हा करारच होऊ शकला नाही. मे २०१५ मध्ये बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. मात्र, बँकेला संचित तोटा असल्याने पगारवाढीचा निर्णय झाला नाही. बँक २०१७ ला नफ्यात आल्यानंतर युनियनने पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून २००४ व २०१८ मध्ये कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक-एक इन्क्रिमेंट, ५ टक्के पगारवाढ व मागील फरक आदी मागण्या युनियनच्या होत्या.गेली वर्षभर बँक व्यवस्थापन व युनियनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यातून ४ टक्के पगार वाढ, ७ वर्षांचा फरक आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. फरकापोटी बँकेने मार्च २०२४ च्या ताळेबंदाला १५ कोटींची तरतूद करून ठेवली आहे; पण फरक एक रकमी देण्याची मागणी युनियनची आहे.

वर्षाला ३७ कोटींचा अतिरिक्त बोजापगार वाढीच्या निर्णयाने जिल्हा बँकेला वार्षिक ३७ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मुळात बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे ताळेबंदावर फारसा ताण पडेल, अशी सध्या तरी स्थिती नाही.

सेवानिवृत्तांनाही महिन्याला १०० रुपयेएप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१७ अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी कोणत्याही पगारवाढ मिळाली नाही. त्यांच्यासाठी युनियनने महिन्याला २०० रुपयांची मागणी केली होती, संचालक मंडळाने १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ७१ महिन्यांचे प्रत्येक ७१०० रुपये मिळणार आहेत.

असे झालेत निर्णय..१ एप्रिल २०१७ पासून ४ टक्के पगारवाढ७ वर्षांचा ३६ कोटी फरकही मिळणारसेवानिवृत्तांना ७१ महिन्यांचे ७१०० रुपये मिळणार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक