तालुक्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:35+5:302021-06-27T04:17:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्याची वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ...

Emphasis on strengthening medical services in the taluka | तालुक्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यावर भर

तालुक्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्याची वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गतवर्षी कोरोना काळात शासकीय रुग्णालयासाठी वैद्यकीय साहित्य मिळवून देणारा राज्यातील आपण पहिला आमदार ठरलो होतो. यावर्षी तालुक्याच्या वैद्यकीय सुविधेसाठी १ कोटीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले असल्याचे प्रतिपादन आ. राजूबाबा आवळे यांनी केले.

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य प्रदान करताना आ. राजूबाबा आवळे बोलत होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. जी. जमादार अध्यक्षस्थानी होते.

आ. राजूबाबा आवळे पुढे म्हणाले, कोरोनामुळे गरीब जनता खचली आहे. शासकीय रुग्णालये हीच गोरगरीब जनतेचा मुख्य आधार आहेत. तालुक्याची आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी पारगाव, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय व संजय घोडावत कोविड सेंटर येथे एक कोटीचे अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ऑक्सिजन ट्रॉली, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, फोल्डिंग बेड, स्ट्रेचर, आयव्ही स्टॅन्ड, ऑक्सिजन मास्क, सेमी कोलन, आयव्ही मास्क व ॲम्ब्युलन्स आदी महत्त्वाच्या साहित्याचा यामध्ये समावेश आहे.

यावेळी अधीक्षक डॉ. मौला जमादार, डॉ. बी. एस. लाटवडेकर, राहुल खामकर, किशोर पाटील, अरुण लोखंडे, सुनील लोखंडे, संजय चरणे, उदय चाळके, अप्पासाहेब पाटील, संपत पोवार, सचिन चव्हाण, संपत बोने, राजू लोखंडे, डॉ. शरीफ पिरजादे, रमेश पाटोळे आदी उपस्थित होते.

२६ पारगाव आवळे साहित्य

फोटो ओळी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य आ. राजूबाबा आवळे यांच्या हस्ते देण्यात आले. (छाया : दिलीप चरणे)

Web Title: Emphasis on strengthening medical services in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.