..अन्यथा एक डिसेंबरनंतर उग्र आंदोलन;सकल मराठा समाजाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:05 IST2018-11-29T00:05:39+5:302018-11-29T00:05:43+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारने सभागृहात सादर केला नाही. दोन दिवसांत अधिवेशन संपणार आहे. एकूणच पाहता, आरक्षण देण्याबाबत ...

..अन्यथा एक डिसेंबरनंतर उग्र आंदोलन;सकल मराठा समाजाचा इशारा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारने सभागृहात सादर केला नाही. दोन दिवसांत अधिवेशन संपणार आहे. एकूणच पाहता, आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची चालढकल सुरू आहे. आगामी दोन दिवसांत सरकारने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा दि. १ डिसेंबरनंतर सकल मराठा समाजातर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, अशा इशारा सकल मराठा समाजाचे सचिन तोडकर आणि स्वप्निल पार्टे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
तोडकर म्हणाले, सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. त्याबाबत दोन दिवसांत कार्यवाही करावी; अन्यथा सध्या सुरू असलेल्या उपोषणाचे रूपांतर उग्र स्वरूपाच्या आंदोलनामध्ये होईल. समाजबांधव रस्त्यांवर उतरून सरकारला त्रासदायक होईल, असे सर्व काही करतील.
पार्टे म्हणाले, आमरण उपोषणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, डॉक्टरांची व्यवस्था केलेली नाही. आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असताना दसरा चौकात बंदोबस्त ठेवण्याचे कारण काय? पोलीस प्रशासनाने जाणूनबुजून आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.