स्वामी विवेकानंद आश्रमतर्फे वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:28+5:302021-01-08T05:15:28+5:30
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त रविवार, दिनांक १० जानेवारी रोजी हायस्कूलमधील मुला-मुलींच्या वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे ...

स्वामी विवेकानंद आश्रमतर्फे वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त रविवार, दिनांक १० जानेवारी रोजी हायस्कूलमधील मुला-मुलींच्या वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन मंगळवार पेठेतील साठमारी येथील श्री स्वामी विवेकानंद आश्रम हॉलमध्ये करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
श्री स्वामी विवेकानंद अध्यात्मिक केंद्र व आश्रमाच्यावतीने यावर्षीही श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. आठवी ते अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा तर पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा दोन गटात चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा कोविड नियमावली पाळून होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेत अगर अध्यक्ष आनंदराव पायमल, किरण अतिग्रे, मनोहर साळोखे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.