कोल्हापूर शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:38 IST2020-09-11T15:37:47+5:302020-09-11T15:38:00+5:30
कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगित मिळाल्याने आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

कोल्हापूर शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
कोल्हापूर : शहरातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगित मिळाल्याने आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी एकूण १४४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १२८९८ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले होते. काही कारणांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने ३६२ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले होते. त्यापैकी १३४ विद्यार्थ्यांनी समितीने दिलेल्या मुदतीत अर्जांमध्ये दुरुस्ती करून घेतली.
या प्रक्रियेनंतर गुरुवारी पहिल्या फेरीची निवड यादी आणि शुक्रवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू केली जाणार होती. मात्र, त्यातच एसईबीसी आरक्षणाला बुधवारी तात्पुरती स्थगिती मिळाल्याने शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबतची सूचना कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला केली.
त्यानुसार प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्य शासन आणि शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
१) कला (मराठी) : ३७२०
२) कला (इंग्रजी) : १२०
३) वाणिज्य (मराठी) : ३३६०
४) वाणिज्य (इंग्रजी) : १६५६
५) विज्ञान : ५९६०