शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
3
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
4
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
5
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
6
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
7
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
8
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
9
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
10
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
11
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
12
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
13
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
14
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
15
'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
16
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
17
डेटिंग साईटवर परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला, भरपूर पैसा खर्च केला अन् अचानक 'ती' दिसली समोर! नंतर जे झालं..
18
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
19
Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
20
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीतील ८८ गावांत सौरऊर्जेवर वीजनिर्मिती होणार; जमिनीचा शोध सुरु

By भीमगोंड देसाई | Updated: July 14, 2025 17:58 IST

३७७ मेगावॅटचे उद्दिष्ट, कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा शक्य

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ५४, तर सांगलीतील ३४ गावांत मुख्यमंत्री सौरकृषिवाहिनी योजनेतून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून सौरऊर्जेवर ३७७ मेगावॅट विजेची निर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. इतकी वीज तयार झाली तर त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे वीज प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रकल्प उभारण्यासाठी ८८ गावांत शासकीय जमिनीचा शोध घेतला जात आहे.राज्यात सध्या कृषिपंपांना रात्री वीज दिली जाते. कृषिपंपधारकांना रात्रीचे पिकांना पाणी देणे प्रचंड त्रासदायक होत आहे. यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा, अशी कृषिपंपधारकांची मागणी आहे. यासाठी गावागावांत मुख्यमंत्री सौरकृषिवीजवाहिनी योजनेतून सोलर प्रकल्प उभारले जात आहेत.हरोली (जि. कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आळते, सातवे, किणी, हरळी, नरंदे येथेही सौरऊर्जेची निर्मिती केली जात आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात ५४ आणि सांगली जिल्ह्यात ३४ गावांत असे आणखी सौरप्रकल्प उभारण्यात येणार आहे.

पाच प्रकल्पांमुळे दिवसा वीज कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सौरप्रकल्पांत तयार होणाऱ्या विजेमुळे परिसरातील ६ हजार ३५० शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सौरप्रकल्प प्रस्तावित असलेल्या गावांची संख्या अशी  आजरा : हरपवडे, उत्तूर, मुम्मेवाडी. चंदगड : कोवाड, चुनरीचवाडा, कार्जिने, आमरोळी, मोरेवाडी, उत्साळी, जंगमहट्टी, पार्लेे, डुक्करवाडी. गडहिंग्लज - महागाव, शेंद्री, हनिमनाळ, हसूरचंपू, रेळेवाडी, पोशारातवाडी, हरळी बुद्रुक. करवीर : बहिरेश्वर, अडूर. हातकणंगले : हेर्लेे, आळते, किणी, नरंदे, रेंदाळ, नेज, म्हाळुंगे, हरोली. शिरोळ : अब्दुललाट, कोथळी, गगनबावडा. पन्हाळा : पिसात्री, माजगाव, सावर्डे तर्फ सातवे, हरपवडे, परखंदळे, गोळीवडे, आळवे. शाहूवाडी : कोळगाव, सरूड, मांजरे, वारूळ, बामणे, तिरवडे, शेनोळी, नरतवडे, बामणी, केनवडे.