शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मिरज मार्गावर डिसेंबरमध्ये धावणार विद्युत रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:04 IST

कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. येत्या २० दिवसांत संबंधित समिती ही पाहणी करणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा आयुक्त समिती करणार पाहणीमालवाहतूक स्वस्त होणार, प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार

संतोष मिठारीकोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. येत्या २० दिवसांत संबंधित समिती ही पाहणी करणार आहे.कोल्हापूर ते मिरज या ५० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी लागला आहे. या मार्गावरून दि. २५ आॅक्टोबरला विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ४० मिनिटांत रेल्वे इंजिन कोल्हापूरहून मिरजमध्ये पोहोचले. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आढळून आली नाही. या मार्गाची रेल्वेची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून पाहणी होणार आहे.

या समितीने हा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर या मार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे धावणार आहेत. येत्या २० दिवसांत या समितीकडून पाहणी झाल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर ते मिरजदरम्यान विद्युत रेल्वे धावतील.

त्यात तिरूपती, कोयना, अहमदाबाद, धनबाद, दिल्ली, गोंदिया, बंगलोर, बिदर, नागपूर, सोलापूर या लांब पल्ल्याच्या आणि कोल्हापूर-मिरज या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्याने मालवाहतूक स्वस्त होईल. प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार असून प्रदूषणही कमी होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर आणि कोल्हापूर, सांगली, मिरज मार्गांवर लोकल सुरू होणार आहेत.निमशिरगावमध्ये होणार प्लॅटफॉर्मनिमशिरगाव येथील स्थानकातून सध्या रेल्वेत चढ-उतार करणे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्यास हा त्रास अधिक वाढणार आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे विभागाने निमशिरगाव स्थानकात प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी झाली. एसएनटी गिअर हे अद्ययावत केले जातील. ‘सीआरएस’ समितीने पाहणी करून प्रमाणपत्र दिल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केल्या जाणार आहेत. कोल्हापूर ते पुणे मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे ध्येय आहे.-जे. पी. मिश्रा, विद्युतीकरण वरिष्ठ प्रबंधक, पुणे विभाग-----------------------------विद्युत रेल्वेची कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. विद्युतीकरणामुळे नव्या रेल्वे सुरू होणार आहेत. आता कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती

 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर