शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

By Admin | Updated: May 8, 2017 00:58 IST2017-05-08T00:58:19+5:302017-05-08T00:58:19+5:30

शेतकऱ्याचावीज पडून मृत्यू

The electricity of the farmer falls and dies | शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू


लोकमत न्यूज नेटवर्क
कोतोली : शेतात पिकाच्या राखणीसाठी गेलेल्या माणकू भागोजी ढवण (वय ६०) या शेतकऱ्याचा शुक्रवारी रात्री वीज पडून मृत्यू झाला. गव्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने पिकांच्या राखणीसाठी शेतकरी रात्री शेतात जातात. माणकू हे सुद्धा पुतण्या बाबूराव विठ्ठल ढवण यांच्यासह राखणीला गेले होते. रात्री बाबूराव घरी आले. त्यानंतर पाऊस व विजेचा कडकडाट सुरूझाला. त्याचवेळी माणकू आणि त्यांच्या कुत्र्यावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले.

Web Title: The electricity of the farmer falls and dies