निवडणूक एकतर्फी, तर शेवटच्या दिवशी पॅनलची घोषणा का?
By Admin | Updated: February 13, 2015 23:48 IST2015-02-13T23:45:35+5:302015-02-13T23:48:43+5:30
गोकुळचे रणांगण : सतेज पाटील यांचा महादेवराव महाडिक यांना सवाल

निवडणूक एकतर्फी, तर शेवटच्या दिवशी पॅनलची घोषणा का?
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) सत्तारूढ गटाकडे एकगठ्ठा ठराव आहेत, निवडणूक एकतर्फी होणार असे म्हणतात तर माघारीच्या शेवटच्या दिवशी पॅनेल जाहीर का करता? असा सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडीक यांना पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्णातील अनेकांनी भेटून आपल्याबरोबर राहण्याचे आश्वासन दिलेले आहे, योग्य वेळी सर्व पत्ते खुले करू पण कोणत्याही परिस्थित ताकदीने पॅनेल उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सतेज पाटील म्हणाले, सत्तारूढ गटाने शक्तीप्रदर्शनाने ठराव दाखल करून गोकुळची निवडणूक एकतर्फी असल्याचे सांगितले, पण गेले निवडणूकीत अशा प्रकारे २७०० पैकी २२०० ठराव गोळा केले होते, पण प्रत्येक्षात मतदानात सत्तारूढ गटाचे उमेदवार १५०० मतापर्यंत राहिले. यावरून ठराव गोळा केले म्हणजे सर्व ठराव धारक मतदान करतात असे नाही. गेले पाच वर्षात सत्तारूढ गटाने कसा कारभार केला, हे दूध उत्पादक ठरावधारक जवळून पाहत आहेत, त्यामुळे यावेळी वेगळे चित्र पहावयास मिळेल. आता एकतर्फी ठराव असल्याचे सांगणाऱ्यांना पॅनेल जाहीर करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट का पाहावी लागते? अशी विचारणा त्यांनी केली. संघाच्या शिरोळ व गोकुळ शिरंगाव प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मिळालेला आहे, त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा काय आहे, हा निधी पुर्वीच्या कामावर खर्च करणार आहेत का? याचे उत्तर कार्यकारी संचालकांनी द्यावे. येईल त्याला बरोबर घेऊन पॅनेल बांधणार असून योग्य वेळी पत्ते खुले करू,असेही त्यांनी सांगितले. प्रारूप मतदार यादीवर २० फेबु्रवारीला हरकती घेणार आहे. त्याचवेळी एका कंपनीची सायकल सभागृहात आणली.