शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:32 IST

येणार ‘प्रशासक’, अन्य निवडणुकांमुळे होणार विलंब

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे. परंतु, नगर पंचायत, नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुकांचे नियोजन असल्यामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या या सर्व ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक’ नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.सन २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४२१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांचीही निवडणूक होणार आहे.त्यामुळे या तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेत प्रशासन गुंतल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाआधी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु, आधीच जाहीर निवडणुकांमुळे जिल्हा प्रशासन या कालावधीत या निवडणुका घेऊ शकणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींपैकी ४२१ ग्रामपंचायतींवर जानेवारीनंतर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Gram Panchayat Elections Likely Postponed Due to Other Local Polls

Web Summary : Kolhapur's 421 Gram Panchayat elections, due in 2026, are likely postponed. Overlapping with Nagar Panchayat, Zilla Parishad, and municipal elections will cause delays. Administrators may be appointed to manage these Gram Panchayats.