शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगाच्या वारीत आली निवडणूक

By admin | Updated: June 25, 2015 01:07 IST

ग्रामपंचायत निवडणूक : मतदानादिवशीच वाखरीचे रिंगण

राजाराम लोंढे / कोल्हापूर राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी २५ जुलैला मतदान होत आहे; पण २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने पायी दिंडीसाठी रवाना झालेले लाखो भाविक मतदानापासून वंचित राहणार आहेत. तीन आठवड्यांच्या वारीत वाखरीचे गोल रिंगण महत्त्वाचे आहे. हे रिंंगण मतदानादिवशी म्हणजे २५ जुलैलाच होत असल्याने उमेदवारांनी कितीही ठरविले तरी वारकऱ्यांना मतदानासाठी गावाकडे आणणे त्यांना अशक्य आहे. शेकडो मतदार पंढरपूरच्या वाटेवर राहणार असल्याने गावकारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. राज्य निवडणूक आयोगाने भागवत धर्माच्या या मोठ्या सोहळ््याची दखल न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आषाढीअगोदर एकवीस दिवस कोल्हापूर जिल्ह्यातून पायी दिंड्या पंढरपूरला रवाना होतात. कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने यंदा ५ जुलैच्या दरम्यान पायी दिंड्या रवाना होणार आहेत. प्रत्येक गावातून तीन-चार दिंड्या पंढरपूरला जातात; त्यामुळे जिल्ह्यातून साधारणत: ६० ते ७० हजार भाविक पायी दिंडीतून जातात; पण याच दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ते १० जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, २५ जुलैला मतदान होणार आहे. त्यामुळे पायी वारीसाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान करणे अडचणीचे होणार आहे. २५ जुलैला दिंडी पंढरपूरनजीक पोहोचलेली असते. वारकारी वारी अर्धवट सोडून मतदानासाठी येण्याची शक्यता फारच कमी आहे. उमेदवारांनी जरी वारीसाठी गेलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था केली, तरी तीन आठवडे भक्तिभावाने सुरू केलेली वारी अर्धवट सोडण्याची अशा मतदारांची मानसिकता नसते.